JOIN US
मराठी बातम्या / Viral / पित्याने मुलाचं ठेवलं अतिशय विचित्र नाव; आता भलत्याच अडचणींचा करावा लागतोय सामना

पित्याने मुलाचं ठेवलं अतिशय विचित्र नाव; आता भलत्याच अडचणींचा करावा लागतोय सामना

समेट वाहुदी यांचं आपल्या नोकरीवर आणि ऑफिसवर इतकं प्रेम होतं, की त्यांनी आपल्या मुलाचं नावही ऑफिसच्या नावावरून ठेवलं.

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 12 जानेवारी : अनेकदा आपल्या मुलांची नावं काहीतरी वेगळी ठेवण्याच्या नादात आई-वडील अशी नावं ठेवतात, ज्यांचा उच्चार करणंही कठीण जातं. यासाठी भरपूर लोकांचा सल्ला आणि इंटरनेटची मदतही घेतली जाते. इंडोनेशियामध्येही एका व्यक्तीने आपल्या मुलाचं नाव इतकं अनोखं ठेवलं (Weird Name of Baby) की हे खरं असल्याचं सिद्ध करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी मुलाच्या जन्माचं प्रमाणपत्र (Birth Certificate) दाखवावं लागतं. एअर होस्टेसने केला विमानातील फर्स्ट क्लासबाबतचा मोठा खुलासा; सांगितला आपला अनुभव इंडोनेशियामध्ये राहणारे 38 वर्षीय समेट वाहुदी स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन ऑफिसमध्ये काम करतात. त्यांचं आपलं काम आणि ऑफिसवर विशेष प्रेम आहे. ही गोष्ट त्यांच्या पत्नीलाही माहिती होता. मात्र, याची कल्पना नव्हती की या प्रेमाचा परिणाम त्यांच्या मुलाच्या नावावरही पाहायला मिळेल. समेट वाहुदी यांचं आपल्या नोकरीवर आणि ऑफिसवर इतकं प्रेम होतं, की त्यांनी आपल्या मुलाचं नावही ऑफिसच्या नावावरून ठेवलं. आपल्या पत्नीला त्यांनी लग्नाआधीच हे सांगितलं होतं की त्यांच्या मुलाचं नाव ऑफिसच्या नावावरुन ठेवण्यात येईल. मग हे बाळ मुलगा असो किंवा मुलगी. त्यांनी हे ठरवलं होतं की आपल्या बाळाचं नाव ते Statistical Information Communication Office असंच ठेवणार. जेव्हा त्यांना मुलगा झाला तेव्हा त्यांनी मुलाचं नाव Statistical Information Communication Office असंच ठेवलं. मात्र, आता प्रत्येकवेळी आपल्या मुलाचं नाव खरं असल्याचं सिद्ध करण्यासाठी त्यांना त्याच्या जन्माचं प्रमाणपत्र दाखवावं लागतं.

VIDEO: पिल्लाला वाचवण्यासाठी कुत्र्यांनी घेतला सिंहासोबत पंगा; बघा पुढे काय घडलं

समेट वाहुदीला 2003 साली ब्रेब्स शहरात एक सरकारी नोकरी मिळाली. त्यांचं आपल्या ऑफिसवर इतकं प्रेम होतं, की ऑफिसला ते आपलं दुसरं घर समजत असे. नेहमी ते असा विचार करत असे, की आपल्या मुलाचं नाव ऑफिसच्या नावावरुनच ठेवायचं. मात्र, ही बाब दुसऱ्यांना अतिशय अजब वाटत असे. आता त्यांच्या मुलाचं नाव Statistical Information Communication Office असं असून डिंको त्याचं टोपण नाव आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या