JOIN US
मराठी बातम्या / Viral / कुत्र्याला वाचवण्यासाठी भिडला तरुण; VIDEO पाहून Anushka Sharma म्हणाली, 'पागल...'

कुत्र्याला वाचवण्यासाठी भिडला तरुण; VIDEO पाहून Anushka Sharma म्हणाली, 'पागल...'

कुत्र्याला वाचवणाऱ्या या तरुणाचा व्हिडीओ पाहून अभिनेत्री अनुष्का शर्माही प्रतिक्रिया देण्यापासून स्वतःला रोखू शकली नाही.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23 फेब्रुवारी : श्वानांचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कुणी त्यांच्यावर प्रेम करताना तर कुणी त्यांना मारताना… सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये एक तरुण कुत्र्यासाठी एका व्यक्तीसोबत भिडला आहे (Man saved dog from other man). हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अभिनेत्री अनुष्का शर्माही यावर प्रतिक्रिया देण्यापासून स्वतःला रोखू शकली नाही (Anushka Sharma comment on man who saved dog life). रस्त्यावरील एका भटक्या कुत्र्याला एका व्यक्तीने मारहाण केली. त्याचवेळी तिथं असलेल्या एका व्यक्तीचं लक्ष गेलं आणि त्या व्यक्तीने त्या कुत्र्याची मारहाण कऱणाऱ्या व्यक्तीच्या तावडीतून सुटका केली. त्या कुत्र्याला प्रेमान आपल्या कुशीत घेतलं आणि त्याला मारणाऱ्या व्यक्तीशीही तो भिडला. हे वाचा -  Video : सर्वांना सळो की पळो करून सोडलं; बैलांच्या कळपावर भारी पडला एकटा पक्षी व्हिडीओत पाहू शकता ही व्यक्ती जसं आपलं मूल कुशीत धरावं तसं या कुत्र्याला धरलं आहे. कुत्र्याचा एक पाय हातात घेऊन त्यावर तो आपल्या तोंडाने फुंकर मारताना दिसतो आहे. कुत्राही घाबरलेला आहे पण या व्यक्तीच्या कुशीत स्वतःला तो सुरक्षितही समजतो आहे.

संबंधित बातम्या

हा व्हिडीओ ऐकल्यावर कुत्र्याला वाचवणाऱ्या व्यक्तीला कुत्र्याला मारणारी व्यक्ती पागल बोलताना दिसते. त्यावेळी ही व्यक्ती मुक्या जीवाने तुझं काय बिघडवलं आहे, त्यालाही भूख लागते, प्रेमाची भूक असते आणि त्याला मी वाचवतो म्हणून मी पागल काय? असं बोलताना दिसतो. हे वाचा -  शाळेत मोबाईल वापरण्याची विद्यार्थ्यांना खतरनाक शिक्षा; शिक्षिकेने आगीत फेकले… हा व्हिडीओ पाहिल्यानंतर बऱ्याच लोकांनी या व्यक्तीचं समर्थन केलं आहे. मुक्या जीवाला वाचवणाऱ्या या व्यक्तीचं कौतुक करत आहेत. अभिनेत्री अनुष्का शर्मानेही हा व्हिडीओ पाहिला आणि तिने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

अनुष्काने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टेसवर हा व्हिडीओ शेअर करत त्यावर कॅप्सन दिलं आहे. पागल तर ते आहेत, ज्यांना माणुसकी समजत नाही. तुम्ही तर…’ असं अनुष्का म्हणाली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या