वाघाचा पाठलाग करणारी व्यक्ती. (फोटो सौजन्य - ट्विटर व्हिडीओ स्क्रिनशॉट)
मुंबई, 10 जानेवारी : वाघ , सिंह, बिबट्या असे जंगलात राहणाऱ्या प्राण्यांना एकदा तरी पाहावं असं कित्येकांना वाटतं. त्यासाठी आपण जंगल सफारीवर, नॅशनल पार्क किंवा प्राणीसंग्रहालयात जातो. हे प्राणी समोर आले की आपल्याला घाम फुटतो. पण काही लोक असे असतात ज्यांना या प्राण्यांना पाहिल्यानंतर इतका उत्साह चढतो की ते स्वत: त्यांच्या इतकं जवळ जातात की आता पुढे काय होईल याचा विचार करूनच आपल्याला धडकी भरते. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडिया वर तुफान व्हायरल होतो आहे. सामान्यपणे अशा ठिकाणी गेल्यावर त्या प्राण्यांना आपल्या कॅमेऱ्यात कैद करतो. अशीच एक व्यक्ती जी अशा खतरनाक प्राण्यांना पाहण्यासाठी जंगलात गेली. तिच्यासमोर अचानक एक वाघ आला. आता यावेळी तुम्ही तिथं असता तर तुमची बोबडी वळली असती. पण ही व्यक्ती मात्र वाघाला पाहून इतकी उत्साही झाली की ती थेट वाघाच्या मागे मागे गेली. हे वाचा - वाघाला पाहता पाहता त्याच्या इतके जवळ गेले पर्यटक की…; तुमचं हार्ट सांभाळूनच पाहा हा भयानक VIDEO व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक व्यक्ती पाठमोरी दिसते आहे. तिच्या हातात कॅमेरा आहे आणि समोर वाघ. वाघ त्या व्यक्तीकडे पाठ करून चालतो आहे. तशी ही व्यक्ती त्या वाघाला आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी त्याचा मागे धावत गेली. जणू काय त्याला त्या वाघासोबत सेल्फीच घ्यायचा आहे. आता पुढे काय होईल याचा विचार करून आपल्याला मात्र इथं घाम फुटतो. हा व्हिडीओ नेमका कुठला आणि कधीचा आहे माहिती नाही. आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
चुकीच्या कारणांमुळे हे व्हायरल होत आहे. वाघ पर्यटन स्थानीय उपजीविकेला बनवून ठेवतं आणि संरक्षणात मदत करतं. पण काही लोकांच्या मूर्खपणामुळे याला डाग लागत आहे. कृपया असा मूर्खपणा करू नका आणि आपल्या मित्रांना वन्यजीव सफारीवेळी जबाबदारीने वागायला सांगा. असं त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. हे वाचा - बंदिस्त वाघाशी मस्तीही जीवावर बेतली, पिंजऱ्यातील वाघाने असा घेतला जीव; भयानक VIDEO आता वाघामागे गेलेल्या त्या व्यक्तीचं काय झालं असेल हे पाहण्याची उत्सुकता तुम्हाला असेल. तर तुम्हीच हा व्हिडीओ पाहा.
या व्यक्तीचं काय झालं या व्हिडीओत तरी दिसलं नाही. पण व्हिडीओ पाहून तुम्हाला याबाबत काय वाटतं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.