JOIN US
मराठी बातम्या / Viral / आगीशी खेळ अंगाशी आला, फुंक मारताच तरुण पेटला; भयंकर दुर्घटनेचा LIVE VIDEO

आगीशी खेळ अंगाशी आला, फुंक मारताच तरुण पेटला; भयंकर दुर्घटनेचा LIVE VIDEO

आगीशी खेळ तरुणावर उलटा पडला आणि त्याच्यासोबत भयंकर घडलं.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 28 ऑक्टोबर : काही लोक पोटासाठी तर काही प्रसिद्धीसाठी आपला जीव धोक्यात घालतात आणि खतरनाक स्टंट करतात. अशाच स्टंटपैकी एक म्हणजे फायर स्टंट. असाच फायर स्टंट म्हणजे आगीशी खेळ एका तरुणाच्या अंगाशी आला आहे. फुंक मारून आग भडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या या तरुणाच्या चेहऱ्यावर आग भडकली आणि त्याचा चेहरा पेटला. हा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. आगीशी स्टंट करतानाचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असातत. नुकताच व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहूनच तुम्हाला धडकी भरेल. आगीशी खेळ उलटा पडला आणि तरुणाचा जीव धोक्यात अडकला. त्यानंतर एकच खळबळ उडाली. व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर शहारा येईल. हे वाचा -  बापरे! केसांसह तरुणही पेटला; Fire Hair Cut करताना भडकली आग; Shocking Video व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक व्यक्ती उंचावर उभा आहे. त्याच्या एका हातात त्याने पेटतं लाकूड धरलं आहे. खाली असलेल्या लोकांकडून तो काहीतरी मागताना दिसतो. तेव्हा एक व्यक्ती त्याचा हातात एक बाटली आणून देते. या बाटलीत पेट्रोल आहे. तरुण हे पेट्रोल आपल्या तोंडात ओततो आणि आग तोंडासमोर धरून त्यावर फुंकतो. तोंडातील पेट्रोलचा फवारा त्या आगीवर उडवून तो फायर स्टंट करण्याचा प्रयत्न करतो. पण आगीशी हा खेळ उलटा पडतो. आग भडकते आणि तरुणाचा चेहराच पेटतो. तरुणाच्या चेहऱ्यावर दाढी आहे, ती आगीत पेटते. तरुण आपल्या हातांनी चेहऱ्यावरील आग विझवण्याचा प्रयत्न करतो पण ती विझत नाही. तेव्हा त्या तरुणासह सर्वजण घाबरतात. इतर लोकही त्याच्या मदतीला येतात आणि त्याच्या तोंडावर मारतात. सुदैवाने शेवटी आग विझल्याचं दिसतं. पण या तरुण नक्कीच भयंकर भाजला असावा. हे वाचा -  मोबाईलवर गप्पा मारत रेल्वे ट्रॅकवर गेली, तिथंच बसली; वरून धडधड करत गेली ट्रेन; भयानक VIDEO हा व्हिडीओ कधीच आणि कुठला आहे माहिती नाही. ravipatidar603 इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून सर्वजण हैराण झाले आहेत.

संबंधित बातम्या

आगीशी असा खेळ जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे हा व्हिडीओ पाहून तुम्ही तरी सावध व्हा आणि तुम्ही असं काही करण्याचा प्रयत्न करू नका, इतकंच आवाहन.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या