मुंबई, 18 सप्टेंबर : गेल्या काही दिवसांपासून कुत्र्यांच्या हल्ल्याची बरीच प्रकरणं समोर आली आहेत. या घटनांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. सोशल मीडियावर बरेच व्हिडीओ व्हायरल झाले आणि चर्चाही झाली. पण या कुत्र्यांपेक्षाही भयानक आहे तो माणूस, असंच म्हणावं लागेल. कारण मुक्या जीवांचा छळ करणाऱ्या अशाच एका व्यक्तीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ पाहून संताप संताप होईल. एका माणसाने कुत्र्याचा छळ केला आहे. व्हिडीओत पाहू शकता एक कुत्रा रस्त्यावर धावताना दिसतो आहे. पण त्याच्या गळ्यात दोरी बांधलेली आहे. खरंतर हा कुत्रा धावत नाही आहे, तर त्याला दोरी बांधून फरफटत नेलं जातं आहे. कुत्र्याच्या पुढे एक गाडी आहे. त्या गाडीला कुत्र्याच्या गळ्यातील दोरी बांधण्यात आली आहे. गाडीत बसलेली व्यक्ती भरधाव गाडी पळवते आहे आणि गाडीला बांधलेल्या दोरीसोबत कुत्रा खेचला जातो आहे. हे वाचा - बापरे! जबड्यात हात धरून फरफटत नेलं आणि…; आणखी एका कुत्र्याच्या हल्ल्याचा भयानक VIDEO तिथूनच जाणाऱ्या एका बाईकस्वाराने ही घटना आपल्या कॅमेऱ्यात कैद केली. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. @GauravAgrawaal ट्विटर अकाऊंटवरील हा व्हिडीओ पाहा.
ही घटना नेमकी कुठली आणि कधीची आहे माहिती नाही. व्हिडीओ पाहून नेटिझन्सन भडकले आहेत. या व्यक्तीला आगीत जिवंत ढकलून द्यायला हवं, करंट देणाऱ्या खुर्चीत बसवायला हवं, अशा संतप्त प्रतिक्रिया या व्हिडीओवर येत आहेत. या व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. हे वाचा - बापरे! छाती ताणून सिंहांसोबत गप्पा मारायला गेला आणि…; तरुणाचं काय झालं पाहा VIDEO कुत्र्यांना तरी आपण नेमकं काय करत आहोत, त्याची गंभीरता माहिती नसावी. पण सर्वकाही माहिती असूनही मुक्या जीवांचा छळ करणाऱ्या माणसांचं काय करायचं?