JOIN US
मराठी बातम्या / Viral / साई बाबांच्या चरणी डोकं टेकवलं अन् उठलाच नाही; भक्ताचा हृदयद्रावक शेवट, Shocking Video

साई बाबांच्या चरणी डोकं टेकवलं अन् उठलाच नाही; भक्ताचा हृदयद्रावक शेवट, Shocking Video

राकेश मेहानी यांचा मंदिरात साईबाबांचं दर्शन घेत असताना मृत्यू झाला. त्यांची साईबाबांवर अतूट श्रद्धा होती. साईबाबांच्या मंदिरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

भोपाळ 04 डिसेंबर : मृत्यू कधी, कसा आणि कोणाला गाठेल हे सांगू शकत नाही. याचाच प्रत्यय देणारी एक घटना मध्य प्रदेशच्या कटनी इथून समोर आली आहे. इथे एका भक्ताचा तेव्हा मृत्यू झाला जेव्हा तो साई बाबांच्या मंदिरात दर्शन घेत होता. कटनीमध्ये साई बाबांचं मोठं मंदिर आहे. इथे मोठ्या संख्येनं लोक साई बाबांचं दर्शन करण्यासाठी आणि आशिर्वाद घेण्यासाठी येतात. VIDEO: 50 प्रवाशांना घेऊन निघालेल्या चालकाचा धावत्या बसमध्ये अचानक मृत्यू; पुढे घडली हादरवणारी दुर्घटना मागील काही दिवसांमध्ये नाचताना मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. मात्र, भक्ताचा मंदिरात दर्शन घेताना मृत्यू झाल्याची ही घटना अतिशय धक्कादायक आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मध्यप्रदेशच्या कटनी येथे राहणारे राकेश मेहानी यांचा मंदिरात साईबाबांचं दर्शन घेत असताना मृत्यू झाला. त्यांची साईबाबांवर अतूट श्रद्धा होती. साईबाबांच्या मंदिरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मंदिरात दर्शन घेत असताना झालेल्या मृत्यूने लोकांना धक्का बसला आहे.

राकेश मेहानी साईबाबांच्या मंदिरात भक्तीभावाने नतमस्तक झाले आणि यानंतर त्यांना पुन्हा उठता आलं नाही, असं सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यांचा जागीच मृत्यू झाला. सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये दिसत आहे की, डोकं टेकवूनही ते बराच वेळ उठले नाही तेव्हा मंदिराचा पुजारी त्यांच्यापर्यंत पोहोचला आणि त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत राकेश मेहानी यांचा मृत्यू झाला होता. Shocking! नवरदेवाला वरमाळा घालताच भयानक घडलं; लखनऊमध्ये नवरीचा स्टेजवरच मृत्यू राकेश मेहानी यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. राकेशच्या मृत्यूनंतर मंदिर प्रशासनाने त्यांच्या कुटुंबीयांना माहिती देऊन मृतदेह ताब्यात दिला. सोशल मीडियावर या घटनेवर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. कोणी म्हणत आहे की भक्ताला आपल्या दैवताच्या चरणी स्थान मिळाले. मात्र, काही लोक हा सर्वसाधारणपणे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना असल्याचे सांगत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या