JOIN US
मराठी बातम्या / Viral / असा नाचला असा नाचला; अखेर ढोलवाल्याने ढोल सोडून त्यालाच बडवलं; पाहा Funny dance video

असा नाचला असा नाचला; अखेर ढोलवाल्याने ढोल सोडून त्यालाच बडवलं; पाहा Funny dance video

डान्सचा हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 11 ऑगस्ट : डान्स (Dance) करायला तसं बहुतेकांना आवडतं. भले अगदी उत्तम डान्स (Dance video)  येत नसला तरी गणपती डान्स (Funny Dance video) तर सर्वांना येतोच. गाणं सुरू लागलं की शरीर आपोआप थिरकू लागतं. काही जण तर असे डान्स करतात की त्यांना ते काय करत आहेत हेसुद्धा समजत नाही. अगदी विचित्र पद्धतीने ते डान्स करतात. अशाच एका विचित्र डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. डान्सचा हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. ही व्यक्ती अशी नाचली आहे की ढोलवाल्यानेसुद्धा आपला ढोल वाजवणं सोडलं आणि या व्यक्तीलाच बडलवलं आहे.

संबंधित बातम्या

व्हिडीओत पाहू शकता ढोलवाले ढोल वाजवत आहेत. इतक्यात एक व्यक्ती तिथं नाचत नाचत येते. नाचता नाचता ती व्यक्ती जमिनीवर पडते आणि जमिनीवर लोळण घेऊन नाचते. ढोलवाल्याच्या पायापाशीच ती व्यक्ती लोळण घेत विचित्र डान्स करत असते. ढोलवाला बघून बघून घेतो आणि शेवटी ढोल वाजवणं थांबवतो. हे वाचा -  ‘ते’ भयंकर 151 सेकंद! बैलाने महिलेला पायाखाली तुडव तुडव तुडवलं; Shocking video ज्या काठीने तो ढोल वाजवत असतो. त्याच काठीने विचित्र नाचणाऱ्या या व्यक्तीला मारायला सुरुवात करतो.  ढोलवाल्याचा मार बसताच अखेर ती व्यक्तीने तिथून गप्पपणे उठते आणि तिथून धूम ठोकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या