JOIN US
मराठी बातम्या / Viral / तब्बल 22 फूटांचा साप खाद्यांवर घेऊन जातोय हा व्यक्ती, VIDEO पाहून तुम्हालाही बसेल शॉक

तब्बल 22 फूटांचा साप खाद्यांवर घेऊन जातोय हा व्यक्ती, VIDEO पाहून तुम्हालाही बसेल शॉक

नवी दिल्ली, 20 ऑगस्ट : काही लोक भयंकर प्राण्यांसोबतही एखाद्या खेळण्याप्रमाणे खेळत असल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहायला मिळतात. काही वेळा हा त्यांच्या कामाचा, नोकरीचा भागही असतो. असाच एक प्राणीसंग्रहालयातील गजब व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media Viral Video) व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये जे ब्रुअर (Jay Brewer) नावाचा व्यक्ती आपल्या खांद्यावर भलामोठा साप घेऊन जाताना दिसतो आहे. जे ब्रुअर (Jay Brewer) सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असतात. ते प्राण्यांसोबत, सापांसोबत आपल्या मित्रांप्रमाणेच खेळताना दिसतात.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 20 ऑगस्ट : काही लोक भयंकर प्राण्यांसोबतही एखाद्या खेळण्याप्रमाणे खेळत असल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहायला मिळतात. काही वेळा हा त्यांच्या कामाचा, नोकरीचा भागही असतो. असाच एक प्राणीसंग्रहालयातील गजब व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media Viral Video) व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये जे ब्रुअर (Jay Brewer) नावाचा व्यक्ती आपल्या खांद्यावर भलामोठा साप घेऊन जाताना दिसतो आहे. जे ब्रुअर (Jay Brewer) सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असतात. ते प्राण्यांसोबत, सापांसोबत आपल्या मित्रांप्रमाणेच खेळताना दिसतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी एका भल्यामोठ्या सापासोबतचा एक व्हिडीओ शेअर केला होता. एक लहानसा साप पाहूनही जवळपास सर्वांचीच भंबेरी उडते. पण जे ब्रुअर यांची मात्र सापांसोबत चांगलीच मैत्री आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये ते अवाढव्य, लांबलचक पिवळ्या आणि काळ्या रंगाच्या सापाला चक्क स्वत:च्या खांद्यावर घेऊन जात असल्याचं दिसतंय.

VIDEO - सुपरमार्केटमध्ये दबा धरून बसला होता भलामोठा अजगर; महिलेने डबा हटवताच…

पिवळ्या-काळ्या रंगाचा हा साप 22 फूटाहून लांब आहे. याला पाहून कोणालाही घाम फुटेल, पण जे ब्रुअर मात्र अगदी सहजपणे त्याला उचलून घेऊन जात आहे.

इतका मोठा आणि जड साप उचलताना कोणीही मदतीसाठी नसल्याचं त्याने कॅप्शनमध्ये म्हटलं असून स्वत:च हा साप आपल्या खांद्यावरुन घेऊन जात आहेत. याआधीही त्यांनी अनेक सापांसोबतचे, प्राण्यांसोबतचे फोटो त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या