ताजमहाल सारखे घर
मोहना ढाकले, प्रतिनिधी बऱ्हाणपूर, 5 जुलै : जगप्रसिद्ध ताजमहाल हे प्रेमाचे सर्वात मोठे प्रतीक मानले जाते. हा सुंदर ताजमहाल आग्रा येथील यमुनेच्या काठावर मुघल सम्राट शाहजहानने त्याची पत्नी मुमताजच्या स्मरणार्थ बांधला होता. पण आग्रापासून 800 किलोमीटर अंतरावर मध्य प्रदेशातही एक ताजमहाल आहे, असे आम्ही तुम्हाला सांगितले तर तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण ही गोष्ट खरी आहे. बऱ्हाणपूर जिल्ह्यात चार बेडरुम असलेले ताजमहालासारखे घर आहे. सुमारे 500 कारागिरांनी तीन वर्षांत हे सुंदर घर बांधले आहे. शिक्षणतज्ञ आनंद प्रकाश चोकसे यांचे हे घर आहे. त्यांनी आपल्या पत्नीला भेट देण्यासाठी ताजमहालासारखे चार बेडरूम आणि एक हॉलचे घर बांधले आहे. 90 बाय 90 फूट मध्ये बांधलेल्या ‘ताजमहाल’ घरात मकराना संगमरवरी दगड वापरण्यात आला आहे.
काय म्हणाले आनंद प्रकाश चोकसे - आनंद प्रकाश चोकसे याबाबत सांगतात की, मुमताजचा बऱ्हाणपूरमध्ये मृत्यू झाला. हे एक प्राचीन शहर आहे, म्हणून मी माझे घर बनवण्यासाठी ताजमहालचे डिझाइन वापरले. बांधकाम झाल्यानंतर लोक त्याचे खूप कौतुक करत आहेत. ते म्हणाले की, माझी पत्नी मंजुषा चोकसे यांच्यासाठी हे ‘ताजमहाल’ घर मी बांधले. ताजमहालसारखे दिसणारे हे घर पाहण्यासाठी मध्य प्रदेश व्यतिरिक्त देश-विदेशातून लोक येथे येत आहेत. इंजीनिअर प्रवीण चोकसे यांनी केले तयार - अभियंता प्रवीण चोकसे यांच्या देखरेखीखाली चार बेडरूम आणि एक हॉल असलेले हे ताजमहालासारखे घर बांधण्यात आले आहे. ते म्हणतात की, सुरत, आग्रा आणि मकराना येथील सुमारे 500 कारागिरांनी तीन वर्षांत हे घर तयार केले. घरात दोन फूट 9-9 इंचांच्या अंतराने भिंत बनवण्यात आली आहे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे हे बाराही महिने थंड असते. आतील आणि बाहेरील तापमानात 10 अंशांचा फरक असतो, असे ते म्हणाले. बऱ्हाणपूर जिल्ह्यातील ‘ताजमहाल’सारखे हे घर आग्राच्या जगप्रसिद्ध ताजमहालपेक्षा तीनपट लहान आहे.