JOIN US
मराठी बातम्या / Viral / हात पकडून वर घेतलं आणि नंतर....चिंपाझीचा मुलासोबतचा प्रेमळ Video

हात पकडून वर घेतलं आणि नंतर....चिंपाझीचा मुलासोबतचा प्रेमळ Video

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशा व्हिडीओंमुळे नेटकऱ्यांचा वेळ मजेत जात असून ते अशा व्हिडीओंना त्यांची पसंती दिसून येते.

जाहिरात

व्हायरल व्हिडीओ

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 27 फेब्रुवारी : सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशा व्हिडीओंमुळे नेटकऱ्यांचा वेळ मजेत जात असून ते अशा व्हिडीओंना त्यांची पसंती दिसून येते. याव्यतिरिक्त अनेक भावनिक, विचित्र, धक्कादायक व्हिडीओदेखील पहायला मिळतात. प्राण्यांच्या व्हिडीओंना जास्त पसंती असलेली पहायला मिळते. त्यांचे अनेक फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर फिरत असतात. सध्या सोशल मीडियावर चिंपाझीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये मादी चिंपाझी आपल्या मुलासोबत खेळताना दिसत आहे. प्राणीसंग्रहालयात आपल्या मुलावर प्रेमाचा वर्षाव करताना मादी चिंपांझीला पाहून नेटकरी आनंदी आणि भावूक दोन्हीही झाले आहेत.

संबंधित बातम्या

हा व्हायरल व्हिडिओ इंस्टाग्रामवर _indian_forest_02 नावाच्या पेजवर पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये प्राणीसंग्रहालयात एक मादी चिंपांझी आपल्या मुलासोबत खेळताना आणि त्याची काळजी घेताना दिसत आहे. यादरम्यान ती कोणत्याही माणसाप्रमाणेच मुलावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहे. सर्वांनाच हा व्हिडिओ खूप आवडला आहे.

चिंपाझीच्या या व्हिडीओवर नेटकरी भरभरुन प्रेम देत असून कमेंटचा वर्षाव करत आहे. अनेकांनी प्राण्यांनाही माणसांप्रमाणे भावना असतात असं म्हटलं आहे, तर काही जण म्हणाले, आईचं प्रेम आहे शेवटी, प्राण्यांसोबत वाईट वागत जाऊ नका, क्युट व्हिडीओ, अशा अनेक प्रकारच्या कमेंट व्हिडीओवर येत आहेत. या व्हिडिओला सोशल मीडियावर एक लाख 19 हजारांहून अधिक लाईक्स आणि 3 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या