सॅन जोस, 18 मार्च : नॅशनल पार्कमध्ये जायला, जंगल सफारी करायला कुणाला आवडत नाही. काही ठिकाणी तर अॅडव्हेंचर पार्क असतात. जिथे थरारक काहीतरी करायला मिळतं. अशाच एका जंगलातील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. जिथं एक लहान मुलगा गेला. हा मुलगा इतका धाडसी की त्याने जंगलात जिप-लाइनिंग (zip-lining) केलं. पण त्याचवेळी त्याच्यासमोर अचानक भयंकर प्राणी आला. व्हिडीओ पाहूनच तुम्हाला धडकी भरले. मध्य अमेरिकेतील कोस्ट रिकातील हा व्हिडीओ आहे. इथल्या गो अॅडव्हेंचर एरनेला पार्कमध्ये (Go Adventure Arenal Park) एक चिमुकला जिप-लाइनिंग (zip-lining) करत होता. मुलगा जिपलाइन करण्यासाठी सुरुवातीला खूप उत्साहात दिसतो. पुढे जाताच समोर एक विचित्र प्राणी दिसतो आणि चिमुकला जोरात किंचाळतो. त्या दोरीवरून जो जिपलाइन करत होता, त्याच दोरीवर एक प्राणी लटकला होता आणि मुलगा जाऊन थेट त्या प्राण्यालाच आदळतो. हे वाचा - पिल्लांना वाचवण्यासाठी खतरनाक कोल्ह्याशी भिडला छोटासा पक्षी; VIDEOचा शेवट शॉकिंग त्याच्यामागे सोबत गाईड असतो, ज्याने ही सर्व घटना आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आहे.
मुलगा सुरुवातीला घाबरलेला दिसतो पण गाईड त्याला हिंमत देतो. त्यानंतर दोघंही हसू लागतात. हा प्राणी म्हणजे स्लॉथ होता. जो सहसा माणसांना हानी पोहोचवत नाही. जे खूपच संथ असतात. हे वाचा - एका हाताने सिगरेट ओढत दुसऱ्या हाताने पकडला साप; तरुणीचा VIDEO पाहून उडेल थरकाप स्लॉथला दोरीवर पाहताच आता पुढे काय करायचं याचा विचार दोघंही करत असतात. त्याचवेळी दोरीवर लटकलेला स्लॉथ मुलाकडे आणि गाईडकडे पाहतो त्यानंतर तो पुढे आपल्या मार्गाने चालू लागतो. त्यामुळे तो पुढे जाईपर्यंत मुलगा आणि त्याचा गाइड दोघंही आहे त्या जागेवर राहण्याचं ठरवतात. जेणेकरून त्या प्राण्याला कोणती हानी पोहोचू नये.