JOIN US
मराठी बातम्या / Viral / शिकारीच्या शोधात पर्यटकांच्या कॅम्पमध्ये शिरला सिंह; शेवटी काय घडलं पाहा, Shocking Video

शिकारीच्या शोधात पर्यटकांच्या कॅम्पमध्ये शिरला सिंह; शेवटी काय घडलं पाहा, Shocking Video

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये (Lioness Viral Video) सिंहीण जंगलातील एका मोकळ्या कॅम्पमध्ये शिरताना दिसते. इथे ती स्वतःसाठी शिकार शोधताना दिसते आणि संधी पाहून कॅम्पमध्ये प्रवेश करते

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 10 जून : सिंह, वाघ, चित्ता, बिबट्या यांसारखे भयानक प्राणी जंगलात राज्य करतात. जंगलात त्यांचा इतका दरारा असतो की इतर कोणताही प्राणी त्यांच्या समोर येण्यास घाबरतो. हे प्राणी जेव्हा शिकारीला निघतात तेव्हा त्यांची भयंकर नजर फक्त त्यांच्या शिकारीवर असते आणि संधी मिळताच ते शिकार पकडतात. सध्या सोशल मीडियावर भुकेल्या सिंहिणीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये सिंहीण शिकारीसाठी भटकताना दिसत आहे (Lioness Enters in Camp). VIDEO: उपचारासाठी चक्क पिल्लाला घेऊन रुग्णालयात पोहोचलं माकड; पुढे काय केलं बघा व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये (Lioness Viral Video) सिंहीण जंगलातील एका मोकळ्या कॅम्पमध्ये शिरताना दिसते. इथे ती स्वतःसाठी शिकार शोधताना दिसते आणि संधी पाहून कॅम्पमध्ये प्रवेश करते. पण त्या कॅम्पमध्ये तिला शिकारीसाठी काहीही मिळत नाही. बराच वेळ तिथे काहीही न मिळाल्याने सिंहीण एक कापड घेऊन बाहेर पडल्याचं व्हिडिओमध्ये दिसतं. समोर सिंहिणीला बघून तिथे उपस्थित बाकीचे लोक खूप घाबरतात.

संबंधित बातम्या

failarmy नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर केला गेला आहे. हा व्हायरल व्हिडिओ आतापर्यंत 4 लाख 77 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तर आत्तापर्यंत त्याला 21,104 लाईक्स मिळाले आहेत. यावर एका यूजरने कमेंट केली आहे की, ‘तुम्ही नीट बघितलं तर तुम्हाला या तंबूतून आत्मा बाहेर पडताना दिसेल.’ दुसऱ्या यूजरने लिहिलं की, ‘मी तिथे फुल बॉडी स्पाइक सूटमध्ये झोपलो होतो.’ पाळीव श्वानांना वाचवण्यासाठी जंगली अस्वलासोबत भिडली महिला; थरारक घटनेचा VIDEO आणखी एका यूजरने लिहिलं, ‘मला तर हा विचार करून भीती वाटतीये की एखादा माणूस तिथे झोपलेला असता आणि सिंहिणही तिथेच जाऊन झोपली असती तर काय झालं असतं?’ हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायर होत असून नेटकरी यावर भरपूर प्रतिक्रिया देत आहेत. तसंच हा व्हिडिओ शेअरही करत आहेत

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या