JOIN US
मराठी बातम्या / Viral / जंगलाचा राजा सिंहाला झेब्राची शिकार करणं पडलं भारी; पुढे असं काही झालं...पाहा VIDEO

जंगलाचा राजा सिंहाला झेब्राची शिकार करणं पडलं भारी; पुढे असं काही झालं...पाहा VIDEO

सिंहाच्या हल्ल्यानंतर, एका झेब्राने सिंहासोबत असं काही केलं, की सिंह शिकारचं सोडून देतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 31 मे : कोणतीही लढाई धैर्याने आणि हुशारीने जिंकली जाऊ शकते. त्यामुळेच जंगलाचा राजा सिंहदेखील (Lion) आपल्या शिकारीपुढे अनेकदा हार मानतो. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात एका सिंहाने झेब्राच्या (Zebra) झुंडीवर हल्ला करण्याची चूक केली आहे. सिंहाच्या हल्ल्यानंतर, एका झेब्राने सिंहासोबत असं काही केलं, की सिंह शिकारचं सोडून देतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एका जंगलात झेब्राची झुंड पाहून जंगलाचा राजा सिंहाने, थेट त्या झुंडीवरच हल्ला केल्याचं दिसतंय. त्या कळपातील सर्व झेब्रा आपला जीव वाचवण्यासाठी पळू लागतात. दुसरीकडे सिंहदेखील आपल्या शिकारीचा पाठलाग करण्यासाठी आणखी वेगात पळू लागतो. याचदरम्यान त्या कळपातील एक झेब्रा मागे राहतो आणि सिंह त्या झेब्रावर हल्ला करण्यासाठी पाठलाग करू लागतो. मागे राहिलेल्या झेब्रावर हल्ला करण्यासाठी सिंह मागून लांब उडी घेतो. झेब्राला खाली पाडण्यासाठी सिंह मोठे प्रयत्न करतो. पण तेवढ्यात झेब्रा सिंहाच्या तोंडावर जोरदार लाथ मारतो. झेब्राची लाथ केवळ सिंहाच्या तोंडावरच नाही, तर त्याच्या पायावरही लागते. झेब्राची भलीमोठी लाथ लागल्यानंतर सिंह चांगलाच जखमी होतो आणि आपली शिकार सोडतो. सिंहाला लाथ मारुन झेब्राही तेथून पळ काढतो. सिंहाच्या तोंडावर, पायावर लाथ लागल्याने तो पुढे लंगडत चालत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसतंय.

(वाचा -  शिकारीच्या शोधात झाडावर चढला बिबट्या, कळपाने आलेली हरणं पाहिली आणि…पाहा VIDEO )

व्हिडीओमध्ये सिंहाच्या तोंडातून रक्त येत असल्याचंही दिसतंय. झेब्राची लाथ सिंहाच्या तोंडावर, जबड्यावर इतक्या जोरात लागते, की शिकरीत तरबेज असलेला सिंह आपली शिकार सोडतो. झेब्राच्या लाथेमुळे जखमी झालेल्या सिंहाला आपली शिकार सोडणं आणि तेथून जीव वाचवणंच अधिक योग्य वाटलं असावं.

(वाचा -  दारू पिऊन गाडी चालवणं दूरच,आता ती स्टार्टच होणार नाही;विद्यार्थ्याने शोधला मार्ग )

हा व्हिडीओ फिल्म अफ्रिका वाईल्ड नावाच्या एका यूट्यूब चॅनेलवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 76 लाखहून अधिक वेळा पाहण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या