JOIN US
मराठी बातम्या / Viral / अजब प्रकरण! दर 6 वर्षांनी याच्यावर कोसळते वीज; मृत्यूनंतरही पिच्छा सोडला नाही

अजब प्रकरण! दर 6 वर्षांनी याच्यावर कोसळते वीज; मृत्यूनंतरही पिच्छा सोडला नाही

गेली 100 वर्षे दर 6 वर्षांनी या व्यक्तीवर आणि आता त्याच्या कबरीवरही वीज कोसळते आहे.

जाहिरात

प्रतीकात्मक फोटो - Canva

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लंडन, 16 जुलै : पावसाळ्यात वीज कोसळण्याच्या बऱ्याच घटना घडतात. वीज कोसळून एखाद्याचा मृत्यू झाल्याच्या काही बातम्या आतापर्यंत तुमच्या कानावर पडल्या असतील, तुम्ही ऐकल्या, वाचल्या असतील. पण एक अशी व्यक्ती जिच्यावर दर सहा वर्षांनी वीज कोसळते. धक्कादायक म्हणजे या व्यक्तीच्या मृत्यूनंतरही विजेने त्याचा पिच्छा सोडला नाही. गेली 100 वर्षे त्याच्या कबरीवरही वीज कोसळतेच आहे. यूकेतील हे अजब प्रकरण आहे. वॉल्टर समरफोर्ड असं व्यक्तीचं नाव आहे. या व्यक्तीला सर्वात दुर्दैवी व्यक्ती म्हणून ओळखली जाते. कुणी आपल्या नशीबाला दोष देत असेल आणि स्वतःला दुर्दैवी समजत असेल. तर या व्यक्तीबाबत वाचल्यानंतर तुम्ही स्वतःला नशीबवान समजाल. कारण या व्यक्तीसोबत अशी घटना घडली, ज्याचा कुणी स्वप्नातही विचार केला नसेल. माणसाची कित्येक शतकांची प्रतीक्षा संपणार; 6 महिन्यांत मिळणार मोठी GOOD NEWS समरफोर्ड ब्रिटिश सैन्यात अधिकारी होता. 1918 मध्ये पहिल्या महायुद्धाच्या वेळी त्यांची बेल्जियममध्ये पोस्टिंग झाली होती. त्या काळात घोडेस्वारी हा मोठा छंद होता. एके दिवशी तो घोडेस्वारीसाठी गेला असता त्याच्यावर वीज पडली. या घटनेनंतर त्याच्या कमरेच्या खालच्या भागाला लकवा मारला. पण इथे नशिबानं त्याला साथ दिली आणि तो काही महिन्यांतच बरा झाला. तो पुन्हा सैन्यात परतला. पण तो पुन्हा आल्यानंतर त्याचे अधिकारी अजिबात खूश नव्हते. अशा स्थितीत बड्या अधिकाऱ्यांनी त्याला जबरदस्तीने सेवेतून काढून टाकलं. यानंतर त्याने कॅनडाला जाऊन नव्याने आपलं आयुष्य सुरू केलं. 1924 साली एके दिवशी तो मासेमारी करत असताना अचानक त्याच्यावर पुन्हा वीज पडली. यामुळे त्याच्या शरीराची उजवी बाजू निकामी झाली. पण इथंही तो बचावला. Viral News : समुद्र किनाऱ्यावर महिलेला दिसला विचित्र जीव, शरीर जलपरी सारखं मात्र डोकं माणसासारखं या घटनेनंतर सहा वर्षांनी त्यांच्यावर तिसऱ्यांदा वीज कोसळली. या दुर्घटनेनंतर दोन वर्षांनी त्यांचा मृत्यू झाला. पण जर तुम्ही विचार करत असाल की वीज आणि वॉल्टरचा संबंध इथंच संपला तर तसं बिलकुल झालं नाही. 1936 साली त्याच्या कबरीवरही वीज कोसळली. त्यानंतर दर सहा वर्षांनी तसंच होतं. याच्यामागे नेमकं कारण काय आहे, हे अद्यापही कोणी शोधू शकलं नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या