JOIN US
मराठी बातम्या / Viral / अंधारात अचानक समोर आला बिबट्या, भीतीने नागरिकांनी त्याच्यावर टॉर्च मारताच...; VIDEO VIRAL

अंधारात अचानक समोर आला बिबट्या, भीतीने नागरिकांनी त्याच्यावर टॉर्च मारताच...; VIDEO VIRAL

जंगलाशेजारी असलेल्या एका कारखान्याजवळील रेल्वे ट्रॅकवर बिबट्या आला. कारखान्यातील कर्मचारी या बिबट्यासमोरच होते.

जाहिरात

रेल्वे ट्रॅकवर अचानक आला बिबट्या.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अंकुश मोरे/भोपाळ, 02 नोव्हेंबर : वाघ, सिंह, बिबट्या असे प्राणी प्रत्यक्षात पाहायला कुणाला आवडणार नाही. पण जितकी या प्राण्यांना पाहण्याची हौस तितकीच त्यांची भीतीही वाटते. अशा प्राण्यांपैकी एखादा प्राणी अचानक तुमच्यासमोर आला तर काय होईल… फक्त कल्पनेनेच तुम्हाला घाम फुटला ना… असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एका कारखान्याजवळ अचानक एक बिबट्या आला आणि कारखान्यातील कर्मचाऱ्यांनी भीतीने त्याच्यावर टॉर्च मारला. त्यानंतर पुढे काय घडलं ते तुम्हीच पाहा. मध्य प्रदेशच्या नेपानगरमधील कागदाच्या कारखान्याजवळील ही घटना आहे. वनक्षेत्राजवळ हा कारखाना आहे. त्यामुळे इथं जंगलातील प्राणी येतात. बिबट्या तर बऱ्याचदा इथं दिसतात. कारखान्यात मालवाहतूक करण्यासाठी कारखान्याच्या परिसरात रेल्वे ट्रॅक आहेत. याच रेल्वे ट्रॅकवर बिबट्या आला. ज्याला पाहून कर्मचाऱ्यांना घाम फुटला. हे वाचा -  दिवसाढवळ्या वर्दळीच्या रस्त्यावर आला वाघ; तरुणीला जबड्यात धरून फरफटत नेलं; भयानक LIVE VIDEO कर्मचाऱ्यांपासून काही अंतरावरच हा बिबट्या होता. एका कर्मचाऱ्याने आपल्या हातातील टॉर्च त्या बिबट्यावर मारला. प्रकाश पाहून बिबट्या घाबरला आणि तो तिथून पळून गेला.

संबंधित बातम्या

स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार नेपानगर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल केली जाते आहे. त्यामुळे वन्य प्राणी जंगलतून बाहेर शहरात येत आहेत. याआधीही ग्रामीण आणि शहरी क्षेत्रातसुद्धा बिबट्या घुसले आहेत. वनविभागाच्या पथकाने त्यांना धरून खंडवातील ओंकारेश्वर जंगलात सोडलं आहे. हे वाचा -  Video viral : गायीला शिकार बनवण्याच्या प्रयत्नात होती मगर, शेपूट धरुन खेचलं पण अचानक… आतापर्यंत या बिबट्यांनी कुणाला नुकसान पोहोचवलं नाही. पण ते कधी हल्ला करतील या दहशतीत नागरिक आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या