फूड डिलिव्हरी बॉयसोबत तरुणीचं धक्कादायक कृत्य
नवी दिल्ली, 12 मे : आजकाल ऑनलाईन फूड मागवण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. लोकांना घरी जेवण बनवायला कंटाळा आल्यावर किंवा काहीतरी वेगळं खाऊ वाटल्यावर ते ऑनलाईन फूडकडे वळतात. दिवसेंदिवस यामध्ये वाढ होताना दिसत आहे. ऑनलाईनच्या जगात जेवणही ऑनलाईन आणि घरपोच मिळत असल्यामुळे लोकांचं कष्ट करणे काही प्रमाणात कमी होत आहे. मात्र कधी कधी ग्राहक आणि डिलिव्हरी बॉयमध्ये वाद होतानाही पहायला मिळतात. एवढंच नाही तर प्रकरण हाणामारीपर्यंतही जातं. अशीच एक घटना सध्या समोर आलीये ज्यामध्ये ग्राहक फूड डिलीव्हरी बॉयला मारहाण करत आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे याविषयी पाहुया. नुकताच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक मुलगी डिलिव्हरी करणार्याला जेवण उशिरा मिळाल्याने मारताना करताना दिसत आहे. एवढंच नाहीतर एक महिलादेखील तिची साथ देताना दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
व्हिडीओमध्ये फूड डिलिव्हरी करणारी व्यक्ती अन्न घेऊन येत असल्याचे दिसून येते. त्याचवेळी तेथे काही महिला येऊन त्याच्याशी वाद घालतात. त्यानंतर अचानक एक मुलगी डिलिव्हरी बॉयवर हात उचलते. प्रकरण एवढ्यावरच थांबत नाही. यानंतर तिथे उपस्थित असलेला मुलगा त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतो मात्र ते काही ऐकत नाही मग तो मुलगाही मुलीला मारहाण करू लागतो. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ नेमका कोणत्या ठिकाणच आहे याविषयी अद्याप समोर आलेलं नाही. मात्र हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.
@Arhantt_pvt नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. अगदी काही वेळातच हा व्हिडीओ वाऱ्यासारखा सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडीओवर भरपूर कमेंटही येत आहेत. अशा घटनांमध्येही वाढ होताना दिसत असून यापूर्वीही असे अनेक प्रकार समोर आले आहेत.