JOIN US
मराठी बातम्या / Viral / आईप्रमाणे जीव लावून वाघिणीच्या बछड्यांना अंगावर खेळवतोय हा श्वान; कारण वाचून व्हाल भावुक, पाहा VIDEO

आईप्रमाणे जीव लावून वाघिणीच्या बछड्यांना अंगावर खेळवतोय हा श्वान; कारण वाचून व्हाल भावुक, पाहा VIDEO

व्हायरल व्हिडिओ दाखवतो की तीन वाघांचे बछडे एका कुत्र्याभोवती कसे खेळत आहेत. त्यांना त्यांच्या आईने अज्ञात कारणास्तव सोडून दिलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 16 मे : सोशल मीडियावर प्राण्यांचे हजारो व्हिडिओ आहेत, पण त्यातील काही; व्हिडिओ असे असतात, जे सगळ्यांचं मन जिंकतात . सध्या असाच एक व्हिडिओ (Video of Tiger Cubs and Dog) समोर आला आहे, जो पाहून तुम्हीही थक्क व्हाल. बॉलिवूड सिनेमांमध्ये अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की एखाद्या बाळाची आई, बाळ लहान असतानाच त्याला काही कारणांमुळे सोडून जाते आणि यानंतर दुसरेच लोक या बाळाला प्रेमाने मोठं करतात आणि आईची कमी जाणवू देत नाही. मात्र, आता ही घटना प्रत्यक्षात समोर आली आहे. 30 वर्षांपासून एकदाही खाली बसू शकलेली नाही महिला; सांगितली स्वतःची वेदनादायी कहाणी सगळ्यात विशेष बाब म्हणजे, यात माणूस नाही तर प्राण्याने हे करून दाखवलं आहे. एक प्राणी दुसऱ्या प्राण्याच्या पिल्लांचं संगोपन करत असल्याचं या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल. एक लॅब्राडोर श्वान वाघिणीच्या पिल्लांचं संगोपन करत असल्याचं यात पाहायला मिळतं.

संबंधित बातम्या

ही घटना चीनची आहे. वाघिणीने तिची तीन पिल्लं सोडली, ज्यांची नंतर लॅब्राडोर श्वानाद्वारे काळजी घेतली जात आहे. आता हा व्हिडिओ इंटरनेटवर लोकांची मनं जिंकत आहे. व्हायरल व्हिडिओ दाखवतो की तीन वाघांचे बछडे एका कुत्र्याभोवती कसे खेळत आहेत. त्यांना त्यांच्या आईने अज्ञात कारणास्तव सोडून दिलं आहे. या बछड्यांच्या आईने जन्मानंतर लगेचच त्यांना दूध देण्यास नकार दिल्याचं सांगण्यात येत आहे. मगरीला पकडण्याच्या प्रयत्नात असलेल्या व्यक्तीला घडली आयुष्यभराची अद्दल, घटनेचा Shocking Video सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की एक लॅब्राडोर कुत्रा जमिनीवर बसला आहे आणि वाघिणीची पिल्ले त्याच्याभोवती फिरत आहेत. तिन्ही पिल्लं इकडे तिकडे उड्या मारत आहेत. प्राण्यांनी आपल्या पिल्लांना अशाप्रकारे सोडल्याची ही पहिली घटना नाही. प्राणी सहसा दोन किंवा अधिक पिल्लांना जन्म देतात आणि अधिक पिल्लांची काळजी घेणं शक्य होत नसल्याने जन्मताच ते आपल्या पिल्लांना सोडून देतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या