घरातील झोपलेल्या व्यक्तीच्या अंगावर सरपटू लागला कोब्रा
राहुल खंडारे, बुलढाणा, 11 जुलै : साप, नाग, कोब्रा, अजगर हे खूप विषारी आणि धोकादायक प्राणी आहे. हे कधी कुठे निघतील काही सांगू शकत नाही. घरामध्ये कुठे कोपऱ्यात तर कुठे बाथरुममध्ये हे प्राणी निघाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. या धोकादायक प्राण्यांचं नाव घेतलं तरी अंगावर काटा उभा राहतो. सध्या एक घटना समोर आलीये ज्यामध्ये घरात कोब्रा साप निघाला. धक्कादायक बाब म्हणजे तो घरात झोपलेल्या व्यक्तींच्या अंगावरुन इकडे तिकडे जात होता. घरात साप निघाल्याचं नुकतंच समोर आलेलं प्रकरण बुलढाण्याचं आहे. झोपलेल्या व्यक्तींच्या अंगा खांद्यावर खेळणाऱ्या या किंग कोब्रा सापामुळे परिसरात खळबळ उडल्याचं पहायला मिळालं.
बुलढाणा शहराला लागून असलेल्या महाबोधी बुद्ध विहारात राहत असलेल्या एका घरात कोब्रा जातीचा साप निघाला आहे. घरचे झोपेत असताना हा कोब्रा घरात शिरला आणि घरातील झोपलेल्या व्यक्तीच्या अंगावर सरपटू लागला. घरातील 12 वर्षाच्या मुलाने या सापाला पकडून बाजूला फेकलं, नंतर सर्प मित्रांना पाचारण करून या सापाला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं. सुदैवाने या कोब्रानं कुणाला चावा घेतला नाही. दैव बलवत्तर म्हणून सापाने चावा घेतला नाही अन्यथा या धोकादायक प्राण्यामुळे एखाद्याचा जीवदेखील गेला असता.
दरम्यान, अशा घरात साप शिरण्याच्या अनेक घटना यापूर्वीही समोर आल्या आहेत. अनेक धक्कादायक घटना आणि त्यांचे व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.