JOIN US
मराठी बातम्या / Viral / मेहुणीला पाहताच सुटला भावोजींच्या मनाचा ताबा, सर्वांसमोरच केला धिंगाणा; VIDEO VIRAL

मेहुणीला पाहताच सुटला भावोजींच्या मनाचा ताबा, सर्वांसमोरच केला धिंगाणा; VIDEO VIRAL

मेहुणी-भावोजीचा लग्नातील हा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

**मुंबई, 02 ऑक्टोबर : ‘**साली आधी घरवाली’, असं म्हटलं जातं आणि खरंच मेहुणी आणि भावोजींची (Jija saali video) जोडी तशी थोडी हटकेच असते. अशा मेहुणी-भावोजींचे (Jiju saali video) बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. ज्यात मेहुणीला पाहताच भावोजी आऊट ऑफ कंट्रोल झाले (Jiju saali dance video). त्यांचा स्वतःवरील ताबा सुटला. एका पंजाबी लग्नातील (Wedding video) मजामस्तीचा हा व्हिडीओ आहे. ज्यात ढोल वाजवत, गाणं गात, डान्स केला जातो आहे. एकेएक करत नात्यानुसार सर्वांना डान्स करायला बोलावलं जातं. त्यावेळी मेहुणी आणि भावोजीसुद्धा हा चान्स सोडत नाही.

संबंधित बातम्या

व्हिडीओत पाहू शकता काही जण ढोल घातात घेऊन ढोल वाजवत आहे. त्याच्या आजूबाजूला बरेच लोक आहेत. या लोकांनी एक वर्तुळ तयार केलं आहे. ढोलवाला ढोल वाजवत एकएकेला डान्स करण्यासाठी या सर्कलमध्ये बोलावतो. हे वाचा -  काय म्हणावं याला! चक्क प्रेशर कुकरसोबतच केलं लग्न; 4 दिवसांतच घटस्फोट सुरुवातीला तो नवरदेवाच्या मेहुणीला बोलावतो. तेव्हा मेहुणी मध्यभागी येते आणि ढोलाच्या तालावर ठेका धरते. त्यानंतर तिच्या काही मैत्रिणीही तिला साथ देतात. त्यानंतर सर्वजण पुन्हा आपल्या जागेवर जातात. ढोलवाला पुन्हा ढोल वाजवतो आणि यावेळी तो मेहुणी आणि भावोजीला डान्स करायला बोलावतो. तेव्हा मेहुणी येऊन थिरकू लागते आणि तिला पाहताच मग भावोजींचा ताबा सुटतो आणि तेसुद्धा मेहुणीसोबत थिरकतात. हे वाचा -  VIDEO: मला सासरी नाही जायचं! पाठवणीवेळीच घराच्या छतावर चढली नवरी अन्… मेहुणी-भावोजी दोघंही एकत्र डान्सचा पुरेपूर आनंद लुटताना दिसत आहेत. भूमिका काकरिया इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या