JOIN US
मराठी बातम्या / Viral / या 'हसीना'च्या प्रेमात अनेक जण फिदा! पण तिचं सत्य समजल्यानंतर सरकली पायाखालची जमीन

या 'हसीना'च्या प्रेमात अनेक जण फिदा! पण तिचं सत्य समजल्यानंतर सरकली पायाखालची जमीन

पहिल्यांदा पहिल्यानंतर कोणालाही एक अतिशय सुंदर मुलगी असल्याचंच वाटेल. मुलगी समजून प्रेमात पडलेल्या तरुणांना याबाबत खरी माहिती समजल्यानंतर मात्र त्यांना अतिशय धक्का बसतो.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी : इंटरनेटच्या जगात सोशल मीडियावर (Social Media) अनेक गोष्टी काही सेकंदात व्हायरल होतात. असेच एका ‘मुली’चे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. मुलगी म्हणून व्हायरल झालेले फोटो हे एका मुलाचे असून अनेकजण त्याच्या सौंदर्याच्या प्रेमात पडले आहेत. पहिल्यांदा पहिल्यानंतर कोणालाही एक अतिशय सुंदर मुलगी असल्याचंच वाटेल. मुलगी समजून प्रेमात पडलेल्या तरुणांना याबाबत खरी माहिती समजल्यानंतर मात्र त्यांना अतिशय धक्का बसतो. अतिशय सुंदर चेहरा हा 19-20 वर्षीय तरुणीचा आहे असं वाटतं, पण ही कोणी मुलगी नसून चक्क मुलगा आहे. जपानमध्ये राहणाऱ्या या इदेगामी बाकू नावाच्या मुलाचा लूक पाहून (Japan Boy Viral Photo) कोणाचीही फसगत होऊ शकते.

हे वाचा -  इंटरनेटवर 7 वर्षाच्या मुलीचे करोडो फॉलोअर्स, एका महिन्याची कमाई ऐकून बसेल धक्का

हा मुलगा त्याच्या गर्ली लूकमुळे अतिशय पॉप्युलर आहे. याचा गर्ली लूकवर तरुणांसह तरुणीही हैराण आहेत. 19 वर्षीय हा मुलगा आपल्या अदांनी सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याच्या गर्ली लूक्समुळे अनेकांची फसगत होते. या मुलाच्या लूकमुळे अनेक तरुण त्याच्या सौंदर्यावर फसतात, प्रेमात पडतात. ही मुलगीच असल्याचं सर्वांना वाटतं. पण त्यानंतर खरी बाब समजल्यानंतर मात्र त्यांना धक्काच बसतो.

हे वाचा -  ‘हे सलून आहे की….’ सलूनच्या HOT PHOTO ने मोठी खळबळ

या तरुणाचा फोटो तुम्ही कितीही वेळा पाहिलात, कितीही जवळून झूम करुन पाहिलात, तरी हा नक्की मुलगा आहे यावर तुमचा विश्वास बसणार नाही. इदेगामी बाकू हा मुलगा मेकअप आणि मॅनीपुलेशन टेक्नोलॉजीचा वापर करुन मुलगी बनतो. त्याचा केवळ चेहराच नाही, तो अदाही मुलींसारख्याच करतो.

संबंधित बातम्या

इदेगामी मागील काही वर्षात जपानमध्ये अतिशय पॉप्युलर झाला आहे. या मुलाहून अधिक गर्ली मुलगा तुम्ही कदाचित कुठेही पाहिला नसेल. इदेगामी सर्वात आधी जपानच्या JUNON Super Boy मध्ये दिसला होता. यातही अनेकजण मुलाचा गर्ली लूक पाहून हैराण होते. आता अशा पॉप्युलॅरिटीमुळे इदेगामी स्वत:ला जेंडरलेस म्हणतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या