JOIN US
मराठी बातम्या / Viral / लग्न मंडपात जाण्याऐवजी वधू पोहोचली भलत्याच ठिकणी, Video होतोय व्हायरल

लग्न मंडपात जाण्याऐवजी वधू पोहोचली भलत्याच ठिकणी, Video होतोय व्हायरल

सोशल मीडियावर सध्या एका वधूने सर्वाचं लक्ष वेधलं आहे. तिच्या हटके कृतीने नवरी मुलगी चर्चेत आली असून तिचा व्हिडीओदेखील समोर आला आहे.

जाहिरात

व्हायरल

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 13 फेब्रुवारी : सोशल मीडियावर सध्या एका वधूने सर्वाचं लक्ष वेधलं आहे. तिच्या हटके कृतीने नवरी मुलगी चर्चेत आली असून तिचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. नवरी मुलगी तिच्या लग्नाच्या दिवशी लग्न मंडपात न जाता थेट कॉलेजमध्ये गेल्याची घटना समोर आली असून याचा व्हिडीओ सोशल मीडियावर फिरत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक तरुणी कारमध्ये नववधूच्या वेशात दिसत आहे. तिला पाहून ती लग्नाच्या ठिकाणी जात असल्याचं वाटत आहे. मात्र पुढे काही भलतंच घडतं. ती लग्न मंडपात न जाता थेट कॉलेजमध्ये गेल्याचं दिसत आहे. तरुणी लग्नापूर्वी प्रात्यक्षिक परीक्षेला बसताना दिसत आहे. वधू मेडिकल कॉलेजमध्ये शिकवते, जी तिच्या लग्नाच्या दिवशी प्रॅक्टिकल असताना प्रथम परीक्षा केंद्रावर पोहोचते. जे पाहून सगळेच थक्क होतात.

संबंधित बातम्या

नववधूचा हा हटके अंदाज पाहून सगळेच थक्क झाले असून हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत असून व्हिडीओवर खूप साऱ्या कमेंट आणि लाईक्सही पहायला मिळत आहे. _grus_girls_ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

दरम्यान, असे अनेक व्हिडीओ यापूर्वीही सोशल मीडियावर समोर आले आहेत. लग्नातील नववधून आणि नवऱ्या मुलाचे असे अनेक व्हिडीओ समोर येत असतात. अनेक हटके व्हिडीओ, मजेशीर, विचित्र व्हिडीओ पहायला मिळतात. मात्र हा व्हिडीओ पाहून अनेकांना काम करण्याचं इन्स्पिरेशन मिळालं असून कोणत्याही परिस्थितीत आपली जबाबदारी पूर्ण करणं महत्त्वांचं असतं याची शिकवण मिळत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या