JOIN US
मराठी बातम्या / Viral / VIDEO: उपचारासाठी चक्क पिल्लाला घेऊन रुग्णालयात पोहोचलं माकड; पुढे काय केलं बघा

VIDEO: उपचारासाठी चक्क पिल्लाला घेऊन रुग्णालयात पोहोचलं माकड; पुढे काय केलं बघा

मादी माकड आपल्या बाळाला छातीला बिलगून क्लिनिकसमोर थांबली आणि तिला आत यायचं आहे, असे हातवारे करून डॉक्टरांना समजावण्याचा प्रयत्न तिने केला (Injured Monkey Visits Clinic with baby).

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 10 जून : बिहारमधील सासाराम येथील एका खासगी दवाखान्यात एक वेगळीच घटना घडली. सामान्यत: क्लिनिकमध्ये फक्त मानवी रुग्ण येतात, मात्र यावेळी एक जखमी मादी माकड आपल्या बाळासह क्लिनिकमध्ये पोहोचली. माकडाच्या डोक्याला दुखापत झाली होती आणि तिच्या बाळाला पायाला दुखापत झाली होती. मादी माकड आपल्या बाळाला छातीला बिलगून क्लिनिकसमोर थांबली आणि तिला आत यायचं आहे, असे हातवारे करून डॉक्टरांना समजावण्याचा प्रयत्न तिने केला (Injured Monkey Visits Clinic with baby). पाळीव श्वानांना वाचवण्यासाठी जंगली अस्वलासोबत भिडली महिला; थरारक घटनेचा VIDEO शाहिजुमा परिसरातील एमएस क्लिनिकमध्ये डॉक्टर अहमद उपस्थित होते. त्यांनी मादी माकडाचे हावभाव समजून घेतले आणि लोकांना माकडासाठी तिथे जागा तयार करण्यास सांगितलं. दरम्यान, मादी माकड आपल्या पिल्लाला छातीशी धरून क्लिनिकमध्ये आलं आणि बाकावर बसलं. यानंतर डॉ.अहमद यांनी माकड आणि तिच्या बाळावर उपचार सुरू केले. त

संबंधित बातम्या

तपासणीअंती डॉ.अहमद यांनी माकड आणि तिच्या बाळाच्या जखमा स्वच्छ केल्या आणि नंतर त्यावर मलम लावले. यानंतर डॉ. अहमद यांनी दोघांना धनुर्वाताचं इंजेक्शनही दिलं. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा अनोखा व्हिडिओ प्रचंड शेअर केला जात आहे. 40 वर्षांपूर्वी हरवला होता कासव, इतक्या वर्षानंतर समोर आलं धक्कादायक चित्र उपचारानंतर, डॉ अहमद यांनी क्लिनिकमध्ये आलेल्या इतर रुग्णांना जागा रिकामी करण्यास सांगितलं. जेणेकरून मादी माकड आपल्या बाळासह आरामात बाहेर जाऊ शकेल. लोक बाजूला गेल्यावर मादी माकड आपल्या पिल्लाला घेऊन शांतपणे तिथून निघून गेली. या माकडाने ज्या पद्धतीने स्वतःवर आणि पिल्लावर उपचार करून घेतले ते खरंच कौतुकास्पद आणि अतिशय दुर्मिळ दृश्य आहे. त्यामुळे या घटनेमुळे डॉक्टरही आश्चर्यचकित झाले. सुरुवातीला त्यांनाही माकडाची भीती वाटली मात्र नंतर त्याच्या वेदना दिसत असल्याने डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या