JOIN US
मराठी बातम्या / Viral / 2 तास काहीच न केल्याचा VIDEO केला पोस्ट; तरीही युट्यूबवर 19 लाख VIEWS

2 तास काहीच न केल्याचा VIDEO केला पोस्ट; तरीही युट्यूबवर 19 लाख VIEWS

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध होण्यासाठी तसा ‘कंटेट’ तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. मात्र जर एखादी व्यक्ती ‘कंटेट’शिवाय प्रसिद्ध होत असेल, तर त्याला तुम्ही काय म्हणाल?

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

इंडोनेशिया, 01 ऑगस्ट : युट्यूब, इन्स्टाग्राम, फेसबुक हे सध्या झटपट प्रसिद्धी मिळवण्याचे एक साधन झाले आहे. या प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध होण्यासाठी तसा ‘कंटेट’ तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. मात्र जर एखादी व्यक्ती ‘कंटेट’शिवाय प्रसिद्ध होत असेल, तर त्याला तुम्ही काय म्हणाल? असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या युट्यूबरने काहीच न करण्याचा व्हिडीओ YouTube वर शेअर केला आहे. यामध्ये तो कॅमेराकडे तब्बल 2 तास बघत बसला आहे. तरीही हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इंडोनेशियातील एका युट्यूबरने हा व्हिडीओ शअर केला आहे. ‘2 JAM nggak ngapa-ngapain’  अर्थात ‘काहीच न करण्याचे दोन तास’ असं कॅप्शन देत या तरुणाने हा व्हिडीओ शेअर केला आहे. Muhammad Didit असं या युट्यूबरचे नाव असून 10 जुलै रोजी त्याने हा व्हिडीओ पोस्ट केला होता. आतापर्यंत 19 लाख पेक्षा जास्त लोकांनी त्याचा हा व्हिडीओ पाहिला आहे.

(हे वाचा- नदीत मासे पकडण्याची हौस ठरली जीवघेणी, नेमकं काय घडलं पाहा VIDEO ) या व्हिडीओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मुहम्मदने असे म्हटले आहे की, ‘ओके, मी हा व्हिडीओ का केला याबाबत थोडे लिहिले पाहिजे. इंडोनेशियातील लोकांनी मला तरुणांना शिक्षण देणारा व्हिडीओ शेअर करण्यासंदर्भात मागणी केली होती. शेवटी भरलेल्या मनाने हा व्हिडीओ पोस्ट करत आहे. तुम्हा Viewers वर या व्हि़डीओचे फायदे अवलंबून आहेत. माझी अपेक्षा आहे की, तुमचे मनोरंजन होईल आणि या व्हिडीओचा फायदा देखील होईल’ (हे वाचा- कोरोनात रुग्णांना तपासण्यासाठी डॉक्टरचा भन्नाट जुगाड, नेटकरी म्हणाले..पाहा VIDEO ) काहींनी या व्हिडीओवर अशी कमेंट केली आहे की हा युट्यूबर चिंतन करत आहे. तर एकाने म्हटले आहे की, ‘जेव्हा तुमच्याकडे जगातील सर्वात मोकळा वेळ असतो.’ अनेकांनी कमेंटमध्ये कौतुक केले आहे ते त्या 19 लाख Viewers चे, ज्यांनी या काहीच न करणाऱ्या युट्यूबरचा व्हिडीओ पाहिला. त्याचप्रमाणे काही जण युट्यूबवर Views मिळवण्यासाठी केलेल्या अतरंगी कल्पनेचं कौतुक देखील करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या