प्रतिकात्मक फोटो
मुंबई, 12 जून : शनिवारी इंडिगोचं विमान पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रात पोहोचल्याचे प्रकरण समोर आले आहे. ज्यामुळे एकच गोंधळा उडाला होता. परंतू सगळे प्रवाशी सुखरुप आपल्या ठरावीक डेस्टीनेशनवर पोहोचले आहेत. खरंतर खराब वातावरणामुळे हा संपूर्ण प्रकार घडला. हे विमान काहीकाळ पाकिस्तानमध्ये पोहोचले, ज्यानंतर ते सुरक्षितपणे भारतीय हवाई हद्दीत परतले. मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबमधील अमृतसर विमानतळावरून टेक ऑफ केल्यानंतर इंडिगोचे फ्लाइट क्रमांक 6E645 पाकिस्तानच्या हवाई हद्दीत पोहोचले. भारतीय वेळेनुसार शनिवारी रात्री 8.01 मिनिटांनी इंडिगोच्या फ्लाइटने अमृतसर विमानतळावरून अहमदाबादसाठी उड्डाण केले. पण हवामान खराब झाल्याने आणि वाऱ्याच्या फोर्समुळे विमानाला पाकिस्तानच्या हवाई हद्दीत जावे लागले. पाकिस्तान नागरी उड्डाण प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार, हे विमान लाहोरजवळ घुसले आणि गुजरानवाला येथे गेले. गुजरानवाला येथे विमान चुकले मिळालेल्या माहितीनुसार, इंडिगोच्या फ्लाईटने शनिवारी रात्री भारतीय वेळेनुसार सकाळी 8:01 वाजता अमृतसरहून अहमदाबादला उड्डाण केले होते, परंतु काही वेळातच हवामान खराब झाले आणि विमानाला पाकच्या हद्दीत जावे लागले. पाक नागरी उड्डाण प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, हे विमान लाहोर, गुजरांवालाजवळ पाकिस्तानात घुसले. शनिवारी रात्री मुसळधार पावसामुळे अमृतसर विमानतळावरून अहमदाबादला जाणाऱ्या इंडिगो एअरलाईन्सचे विमान हवामानाच्या समस्येमुळे पाकिस्तानच्या हवाई हद्दीत पोहोचले. विमानाने सकाळी 8:00 वाजता उड्डाण केले, नंतर 8:01 वाजता पाकिस्तानच्या हवाई हद्दीत प्रवेश केला आणि 8:30 च्या सुमारास परत आले. खराब हवामान स्थिती याआधी डॉन वृत्तपत्राने वृत्त दिले होते की, इंडिगो विमान शनिवारी संध्याकाळी 7.30 च्या सुमारास लाहोरच्या उत्तरेला 454 नॉट्सच्या ग्राउंड स्पीडने दाखल झाले होते. पाकिस्तानच्या नागरी उड्डाण प्राधिकरणाच्या (सीएए) वरिष्ठ अधिकाऱ्याचा हवाला देऊन, पेपरमध्ये म्हटले आहे की, हे असामान्य नाही कारण खराब हवामानाच्या परिस्थितीत “आंतरराष्ट्रीय स्तरावर परवानगी” देण्यात आली होती.