JOIN US
मराठी बातम्या / Viral / Viral : मालगाडी खाली अडकली व्यक्ती, जीवन मरणाचा संघर्ष व्हिडीओत कैद

Viral : मालगाडी खाली अडकली व्यक्ती, जीवन मरणाचा संघर्ष व्हिडीओत कैद

आता तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच उभा राहिला असणार की जर ट्रेन अंगावरुन गेली, तरी देखील ही व्यक्ती जिवंत कशी? तुम्ही हा व्हिडीओ पाहा. तुमच्या सगळं लक्षात येईल.

जाहिरात

Viral Video

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

भागलपूर ११ नोव्हेंबर : सोशल मीडियाचं वेड हे सगळ्यांनाच लागलं आहे. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच इथे येऊन माहिती मिळवण्याचं आणि व्हिडीओ पाहाण्याचा मोह अजिबात आवरत नाही. तसेच एकदा का एखादा व्यक्ती इथे आला की, त्याचा तासनतास वेळ कसा निघून जातो. हे त्याचं त्यालाच कळत नाही. इथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतात. जे कधी मनोरंजक तर कधी भीतीदायक असतात. सध्या एक व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती शॉर्टकट मारण्याच्या नादात फसतो आणि त्याच्यावरुन अख्खी मालगाडी जाते. ही घटना कहालगाव रेल्वे स्थानकाची आहे. थोडासा वेळ वाचवण्यासाठी ही व्यक्ती आपला जीव धोक्यात घालते. ज्यामुळे तिचा जीव देखील जाऊ शकला असता. परंतु तिचं नशीब चांगलं होतं, ज्यामुळे तिला आपले प्राण गमवावे लागले नाही. अशी अनेक उदाहरणे अलीकडे समोर आली आहेत, पण त्यानंतरही अशा चुका रोजच पाहायला मिळतात. हे ही वाचा : चोराचं नशीब खराब की दुकानदार हुशार? हा Video पाहून तुम्हीच ठरवा आता तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच उभा राहिला असणार की जर ट्रेन अंगावरुन गेली, तरी देखील ही व्यक्ती जिवंत कशी? तुम्ही हा व्हिडीओ पाहा. तुमच्या सगळं लक्षात येईल.

मालवाहू ट्रेनखाली माणूस हा व्हिडीओ भागलपूर जिल्ह्यातील कहालगाव रेल्वे स्थानकाचा असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, रेल्वे ट्रॅकच्या मध्यभागी एक प्रवासी पोटावर पडलेला आहे आणि त्याच्यावरुन एक मालगाडी जात आहे. जेव्हा मालगाडी निघते तेव्हा ती व्यक्ती उठते आणि हसून तेथून निघून जाते. या व्यक्तीचं नशीब चांगलं होतं की त्याला काहीही झालं नाही, नाहीतर विचार करा की या व्यक्तीसोबत काय घडलं असतं. सुरक्षित बाहेर आला ही घटना जेव्हा घडली, तेव्हा त्याच्याभोवती गर्दीत इतर अनेक लोक उभे आहेत, जे त्याला असेच झोपून राहाण्याचा सल्ला देत आहेत. जेव्हा ही व्यक्ती सुखरूप बाहेर पडते, तेव्हा लोकांनीही दीर्घ श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, ही व्यक्ती कहालगाव रेल्वे स्थानकावरून प्रवासासाठी निघाली होती. ज्या ट्रेनने ती प्रवास करणार होती, ती प्लॅटफॉर्म क्रमांक दोन किंवा तीन वर उभी होती, जी लवकरच सुरु होणार होती. त्यानंतर त्या व्यक्तीला वाटले की ट्रेन पकडण्यासाठी शॉर्टकट मार्ग शोधला पाहिजे. पण मालगाडी मध्येच उभी होती.

मग या व्यक्तीने या गाडीमधून जाण्याचा प्रयत्न केला, पण तितक्यात गाडी सुरु झाली. तेव्हा या व्यक्तीने गाडीखाली झोपून राहण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे त्याचे प्राण वाचले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या