फोटो सौजन्य - LinkedIn
भोपाळ, 16 फेब्रुवारी : अरे यार फक्त काम… काम… काम… कदाचित असं काही असतं की आठ तासांनंतर काम करायलाच मिळालं नसतं तर… ऑफिस काम करताना तुम्हालाही कधी तरी असं वाटलं असेल नाही का? कारण कामावर 8 तासांची ड्युटी आता फक्त नावापुरती राहिली आहे. बऱ्याच कंपनीत कर्मचारी कित्येक तास काम करतात. तास संपतात पण काम नाही. काम करावं तितकं कमीच. पण एका भारतीय कंपनीने मात्र कित्येक लोकांच्या फक्त आठ तास ड्युटीचं स्वप्न खरं केलं आहे. म्हणजे 8 तासांनंतर तुम्ही या कंपनीत वाटलं तरी काम करूच शकणार नाही. कारण शिफ्ट संपल्यानंतर कर्मचाऱ्यांना घरी पाठवण्यासाठी कंपनीनेच तशीच जबरदस्त सेटिंग केली आहे. ऑफिसमध्ये शिफ्टपेक्षा जास्त वेळ काम करावं लागतं अशी तक्रार बहुतेक कर्मचाऱ्यांची असते. काही जणांना तर या अतिरिक्त कामाचा फायदाही मिळत नाही. म्हणजे त्यांचा हा कामाचा अतिरिक्त वेळ ओव्हरटाईम म्हणून पकडला जात नाही. त्याच त्यांना अतिरिक्त पैसे मिळत नाही. तरी कोणताही कर्मचारी हे थांबवतही नाही. पण अशाच कर्मचाऱ्यांचा विचार मात्र भारतातील या कंपनीने केला. या कंपनीने कॉम्प्युटरमध्ये तशी सेटिंग केली आहे. ज्यामुळे सिस्टमच कर्मचाऱ्यांना शिफ्ट संपल्यानंतर काम करण्यापासून रोखतं आणि घरी जायला सांगतं. हे वाचा - बस्स झालं शिक्षण, आता नोकरी हवीये? मग तुमच्यासाठी हे क्षेत्रं आहेत परफेक्ट; लाखोंमध्ये मिळेल पगार या कंपनीच्या एचआरने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत याची माहिती दिली आहे. तन्वी खंडेलवाल असं या एचआरचं नाव. तिने सांगितलं, आमची कंपनी घऱ आणि कामामध्ये संतुलन राखण्यात समर्थन देतं. त्यांनी एक स्पेशल रिमांइडर लावलं आहे, जे शिफ्ट संपताच डेस्कटॉप लॉग करतं आणि वॉर्निंगही देतं. शिफ्ट संपल्यानंतर कोणतेही कॉल्स किंवा मेल येणार नाही. तिने जो फोटो पोस्ट केला आहे, तो डेस्कटॉपचा फोटो आहे. ज्यात 8 तासांची ड्युटी संपल्यानंतरची सूचना दिसते आहे. सावधान! तुम्ही शिफ्ट संपली आहे. ऑफिस सिस्टम 10 मिनिटांत बंद होईल. कृपया घरी जा. असा हा मेसेज आहे. आता ही कंपनी कुठली आणि कोणती आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असेल. ही कंपनी आहे, मध्य प्रदेशच्या इंदौरमधील. SoftGrid Computers असं या कंपनीचं नाव. हे वाचा - Layoffs News : मेटामध्ये पुन्हा कर्मचारी कपात होणार, नेमकं काय आहे कारण? ही पोस्ट पाहिल्यानंतर यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. एका युझरने असं प्रत्येक कामाच्या ठिकाणी हवं. एका युझरने, असे प्रयत्न काम करायला प्रोत्साहन देतात. तुमचं याबाबत काय मत आहे, ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.