JOIN US
मराठी बातम्या / Viral / डोकं दुखायला लागलं म्हणून केलं अ‍ॅडमिट, X-ray पाहून डॉक्टरांनाच भरली धडकी

डोकं दुखायला लागलं म्हणून केलं अ‍ॅडमिट, X-ray पाहून डॉक्टरांनाच भरली धडकी

डॉक्टरांनी X-ray काढल्यानंतर त्यांना जे काय दिसलं ते पाहून संपूर्ण रुग्णालय हादरलं.

जाहिरात

विज्ञानाच्या मदतीनं सध्या काही अशक्य राहिले नाही आहे. असाच काहीसा प्रकार नुकताच घडला. ज्यात डॉक्टरांनी तब्बल 7 तास ऑपरेशन करून एक व्यक्तीचा मनगटापासून तुटलेल्या हाताचा तळवा पुन्हा जोडला.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बीजिंग, 17 एप्रिल : सध्या कोरोनामुळे जगभरात चीनची चर्चा आहे. चीनच्या वुहानपासून पसरण्यास सुरुवात झालेल्या या विषाणूने जगाला पोखरून काढले. यासगळ्यात चीनमध्ये एक भयानक प्रकरण डॉक्टरांसमोर आले. चीनमध्ये केशेडोंग प्रांतात एक वृद्ध इसम डोकं दुखत असल्यामुळे रुग्णालयात दाखल झाला. मात्र रुग्णालयात दाखल झाल्यानंतर डॉक्टरांसमोर एक धक्कादायक रिपोर्ट आला. या इसमाच्या X-ray मध्ये त्याच्या डोक्यात चाकू असल्याचे दिसून आले. इंडिया टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार केशेडोंग प्रांतातील या इसमाच्या डोक्यात चाकू असल्याचे आढळून आले. या इसमाचे नाव डोयोरीजी असून, ते व्यवसायाने शेतकरी आहेत. एका व्यक्तीने  डोयोरीजी यांच्यावर चाकू हल्ला केला होता. तेव्हापासून हा चाकू त्यांच्या डोक्यात आहे. ही घटना 26 वर्षांपूर्वी घडली होती. तब्बल 26 वर्ष डोयोरीजी यांच्या डोक्यात चाकू तसाच होता. 1990मध्ये त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. डॉक्टरांनी X-ray काढल्यानंतर ही बाब त्यांच्या लक्षात आली. वाचा- पाण्यापासून दारूपर्यंत सगळं फ्री तेही घरपोच! संगीत दिग्दर्शकाची अनोखी सेवा

वाचा- VIDEO : रस्त्यावर सांडलेलं दूध जेव्हा माणूस आणि कुत्रे एकाचवेळी पितात तेव्हा… डोयोरीजी यांच्यात डोक्यातील हा चाकू काढण्यासाठी डॉक्टरांना अथक प्रयत्न करावे लागले. त्यांनी दोन भागात शस्त्रक्रिया करून 4 इंच लांब चाकू डोक्यातून बाहेर काढला. पहिले ऑपरेशन 2 एप्रिल तर दुसरे 8 एप्रिलला करण्यात आले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार हा प्रकार एका चमत्कारापेक्षा कमी नाही आहे. मुळात 26 वर्ष डोक्यात सुरू असून डोयोरीजी जिवंत कसे राहिले, असा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार हा सुरा त्यांच्या रक्त वाहिन्यांपासून दूर होता. तसेच, त्यांच्यावर 26 वर्षांपूर्वी योग्य उपाचर करण्यात आले नाहीत.

वाचा- Social Distancing यांच्याकडून शिका! मानवालाही लाजवेल असा PHOTO VIRAL डॉक्टरांनी त्यांच्या एक्स रे रिपोर्टचा फोटो सोशल मीडियावर टाकल्यानंतर हा फोटो व्हायरल झाला. शेडोंग क्वानफोशन हॉस्पिटलने ही यशस्वी शस्त्रक्रीया केली. या रुग्णालयाचे प्रमुख लियू यू गुआंगकुन यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या आयुष्यातील ही सर्वात कठिण शस्त्रक्रीया होती. मात्र आता डोयोरीजी यांची प्रकृती स्थिर असून, काही दिवसांत त्यांना डिस्चार्जही दिला जाईल. संकलन, संपादन-प्रियांका गावडे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या