JOIN US
मराठी बातम्या / Viral / टायरमध्ये सिमेंट भरलंय का? सायकल आणि कारच्या धडकेत कारचीच झाली भयाण अवस्था

टायरमध्ये सिमेंट भरलंय का? सायकल आणि कारच्या धडकेत कारचीच झाली भयाण अवस्था

एक अपघाताचा फोटो सोशल मीडियावर सगळ्यांतं लक्ष वेधून घेत आहे. हा फोटो पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.

जाहिरात

व्हायरल

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 9 फेब्रुवारी : दिवभरात अनेक अपघात घडत असतात. रस्त्यावर होणाऱ्या अपघातात अनेक वेळा गाड्यांचं लाखोंचं नुकसान होतं तर कधी माणसे गंभीर जखमी होतात. याचे अनेक फोटो व्हिडीओदेखील सोशल मीडियावर फिरत असतात. सध्या असाच एक अपघाताचा फोटो सोशल मीडियावर सगळ्यांतं लक्ष वेधून घेत आहे. हा फोटो पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. सध्या समोर आलेला अपघाताचा फोटो प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोयंका यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. फोटो पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. या व्हायरल फोटोमध्ये दिसतंय की एका चारचाकी कारची दुचाकीशी धडक झाली आहे. या अपघातात कोणत्याही व्यक्तीची जिवितहाणी झाली नाही. मात्र या धडकेत कारच्या पुढील भागाचं नुकसान झालं आहे. हा फोटो व्हायरल होताच नेटकऱ्यांनी खिल्ली उडवायला सुरु केली आणि हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

संबंधित बातम्या

हर्ष गोयंका यांनी फोटो पोस्ट केला आणि कॅप्शन लिहिले, “तुमच्याकडे योग्य मजबूत टायर असल्यास हे शक्य आहे.” यासोबतच त्याने एक इमोजीही शेअर केला आहे. हे चित्र पाहून इंटरनेट वापरकर्ते थक्क झाले. अवघ्या अर्ध्या तासात तो 10 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला. शेकडो लोकांनी ते लाइक केले आहे. अनेकजण मजेशीर कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले की, टायरमध्ये सिमेंट भरले होते का? एका यूजरने लिहिले, कार मेड इन चायना, सायकल मेड इन जपान. अनेकांचा या चित्रावर विश्वास बसत नाहीये. तर काहींनी लिहिलं, हे शक्य आहे का?

दरम्यान, अशा हटके घटना आणि त्यांचे फोटो व्हिडीओ हे सोशल मीडियावर कायमच व्हायरल होत असतात. नेटकरीही अशा पोस्टची मजा घेताना दिसून येतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या