व्हायरल व्हिडीओ
नवी दिल्ली, 6 मार्च : रस्त्यावर दुचाकी चालवताना हेल्मेट घालणं खूप आवश्यक आहे, हे आपल्याला सर्वांनाच माहित आहे. हेल्मेटशिवाय गाडी चालवणे धोकादायक ठरु शकतं. मोठ्या अपघातातूनही अनेकजण हेल्मेटमुळे वाचतात. हेल्मेटशिवाय गाडी चालवताना दिसलात तर ट्रॅफिक पोलिसांपासून वाचण्याचा प्रयत्न सर्व करतात. अशातच एक घटना समोर आलीये ज्यामध्ये एका व्यक्तीकडे हेल्मेट नव्हते तर त्याने हटके जुगाड केला आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधत आहे. सोशल मीडियावर सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने हेल्मेटसाठी एक खास ऑप्शन शोधला आहे. जो पाहून तुम्हीदेखील हैराण व्हाल. व्हिडीओमध्ये दिसतंय की, एक व्यक्ती दुकानात गेला आणि त्याने पाईपचा हेल्मेटसारखा प्रकार बनवला. गाडीवर बसल्यावर त्याने तो पाईप डोक्यात घातला. एका व्यक्तीने त्याचा व्हिडीओदेखील काढला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावर व्हिडीओवर खूप कमेंटदेखील येत आहे.
व्हिडीओ पाहिल्यानंतर काही लोकांनी असेही म्हटले की, हा जुगाड पाहून पोलिसांनाही आश्चर्य वाटेल की, त्यांचे चालान कशासाठी करावे. हा व्हिडिओ 31 डिसेंबर 2022 रोजी शेअर करण्यात आला होता आणि आतापर्यंत त्याला 71 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे, तर लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे. bawandarbehari नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर असे जुगाडचे अनेक व्हिडीओ समोर येत असतात. सोशल मीडियावर असे व्हिडीओ झपाट्याने व्हायरल होतात. जुगाड करुन लोक अनेक विचित्र, हटके, मजेशीर गोष्टी तयार करत असतात.