कलेक्टर तुषार सुमेरा
मुंबई 26 सप्टेंबर : ‘नेव्हर जज बुक बाय इट्स कवर’ हे तुम्ही बऱ्याचदा लोकांना बोलताना ऐकलं असेल, परंतू आज या वाक्यासाठी एक उत्तम उदाहरण समोर आलं आहे. असं म्हणतात की जगातील सगळ्यात कठीण परिक्षेंपैकी एक आहे ती म्हणजे स्पर्धा परिक्षा युपीएससी. ही परिक्षा सगळ्यांनाच पास करणं शक्य नसतं. असे कमी लोक असतात, ज्यांना ही परिक्षा पास करण्यात यश मिळतं. त्यामुळे अनेकांच्या मनात असा समज झाला आहे की, जे लोक शाळेत किंवा कॉलेजपासून हुशार असतात, फक्त त्यांनाच ही परिक्षा पास करता येते. पण तुमचा हा समज चुकीचा आहे. खरंतर ग्रेड किंवा नंबर आपलं करिअर, तसेच भविष्य ठरवत नाही. आपण काय करायचंय हे फक्त आणि फक्त आपल्या इच्छा शक्तीवरती अवलंबून असते आणि हे एका आयएएसने सिद्ध केलं आहे. आयएएस अधिकाऱ्याची मार्कशीट व्हायरल झाली, त्यानंतर यामागची खरी कहाणी चर्चेत आली. हे वाचा : 25 कोटींची लॉटरी लागली, तरी रिक्षा चालकावर आली पश्चातापाची वेळ, नक्की असं काय घडलं? जेव्हा जेव्हा आयएएस अधिकार्यांबद्दल विचार येतो, तेव्हा लोकांच्या मनात असा समज असतो की ते नेहमीच त्यांच्या वर्गात टॉपर्स असले पाहिजेत, परंतु हा समज चुकीचा सिद्ध झाला आहे. गेल्या काही वर्षांत इलॉन मस्क आणि आयएएस अधिकारी शाहिद चौधरी यांसारख्या अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी हे सिद्ध केलं आहे की तुमच्या शाळेतील मार्कांचा तुमच्या आयुष्यावर फारसा परिणाम होत नाही. मुलांचे शाळेतील गुण आणि त्यासाठीचं पालकांकडून मुलांवर दिलं जाणारं प्रेशर, हे सगळं बदलण्यासाठी अनेक आयएएस अधिकाऱ्यांनी त्यांच्या बोर्ड परीक्षेच्या मार्कशीट सोशल मीडियावर टाकल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी त्यांची मार्कशीट शेअर केली होती, त्यानंतर त्यांनी भरूचचे जिल्हाधिकारी तुषार सुमेरा यांची मार्कशीटही शेअर केली. आयएएस अवनीशच्या ट्विटमध्ये दोन छायाचित्रे आहेत. त्यापैकी एक भरुचचे कलेक्टर तुषार सुमेरा आहेत आणि दुसरा फोटो त्यांची मार्कशीट दाखवतो ज्यात त्याच्या दहावीच्या बोर्ड परीक्षेत मिळालेल्या गुणांची यादी आहे. त्याची दहावीची ही मार्कशिट पाहिल्यावर तुम्हाला कळेल की त्यांना जेमतेम पासिंग गुण मिळाले आहेत. त्यांना इंग्रजीत 35, गणितात 36 आणि विज्ञानात 100 पैकी 38 गुण मिळाले आहेत. हे ही पाहा :
अधिकारी अवनीशने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘भरूचचे जिल्हाधिकारी तुषार सुमेरा यांनी दहावीची मार्कशीट शेअर करताना लिहिले आहे की, त्यांना दहावीत फक्त उत्तीर्ण गुण मिळाले आहेत. त्यांचे हे मार्क पाहून संपूर्ण गावात, तसेस शाळेत लोक असं बोलू लागले की, ते आयुष्यात पुढे काहीही करु शकणार नाहीत. परंतू त्यांनी आज या सगळ्यांना खोटं ठरवत, आयएएस अधिकारी झाले आहेत. तसेच त्यांनी आपल्या आई-वडिलांचे, गावाचे, शहराचे आणि देशाचे नाव अभिमानाने उंचावले आहे.