प्रतिकात्मक छायाचित्र
हैदराबाद, 21 फेब्रुवारी : एका चार वर्षांच्या मुलावर रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांच्या झुंडीने हल्ला केल्याची घटना घडली आहे. कुत्र्यांनी मुलाचे लचके तोडले आणि त्याला ओढत नेले. यावेळी लहान मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकून त्याचे वडील धावत आले आणि त्यांनी कुत्र्यांच्या तावडीतून मुलाची सुटका केली. कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मुलाला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र रुग्णालयात त्याला मृत घोषित करण्यात आले. याबाबत मिळालेली माहिती अशी की, हैदराबादमध्ये गंगाधर हे सुरक्षा रक्षकाचे काम करतात. त्यांचे कुटुंबियसुद्धा तिथे राहते. ते ज्या इमारतीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात तिथेच कुत्र्यांनी मुलावर हल्ला केला. या घटनेचं सीसीटीव्ही फूटेज समोर आलं आहे. सीसीटीव्हीत दिसतं की, मुलगा कुठेतरी जात असताना त्याच्या मागून तीन कुत्रे येतात आणि हल्ला करतात.
सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसतं की कुत्र्यांनी हल्ला केल्यानतंर मुलगा जमिनीवर पडते. यानंतर कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला करत चावा घेतला आणि मुलाला ओढतही नेलं. या हल्ल्यानंतर मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकून त्याचे वडील तिथे पोहोचले आणि त्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात नेलं. पण उपचारापूर्वीच मुलाचा मृत्यू झाला. या प्रकरणाची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. हेही वाचा : मालेगावच्या तरुणाची जीवघेणी स्टंटबाजी, वेगवेगळे कर्तब करताना Video व्हायरल उत्तर प्रदेशात शनिवारी अशाच प्रकारची घटना घडली. भटक्या कुत्र्यांनी एका तास वर्षांच्या मुलावर हल्ला केल्यानं त्याचा मृत्यू झाला. यावर पोलिसांनी माहिती देताना सांगितलं की, कान्हा नावाचा मुलगा घराच्या अंगणात खेळत असताना बिलासपूर गावातील भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. त्यांनी कान्हाला चावा घेतल्यानं तो जखमी झाला होता. त्यावेळी गावकऱ्यांनी कुत्र्यांना तिथून पळवून लावले आणि कान्हाला रुग्णालायत नेलं पण तिथे त्याला मृत घोषित केलं गेलं. याआधी हैदराबादमध्ये एका स्विगी डिलिव्हरी बॉयवर जानेवारी महिन्यात हल्ला केला होता. कुत्र्यांच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी त्याने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली होती. यात त्याला गंभीर दुखापत झाली होती.