JOIN US
मराठी बातम्या / Viral / साबणाचा शोध लागला नव्हता तेव्हा, कपडे कसे साफ केले जायचे?

साबणाचा शोध लागला नव्हता तेव्हा, कपडे कसे साफ केले जायचे?

पूर्वीच्याकाळी साबण सर्फ नव्हतं. मग त्यावेळी लोक कसे कपडे धुवायचे? तेव्हा या सगळ्याच्या जागी काय वापरलं जायचं? तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का?

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 6 ऑक्टोबर : आपल्या आजूबाजूला अनेक अशा गोष्टी आहेत, ज्यांचं इन्वेन्शन हळूहळू केलं गेलं. म्हणजे एक काळ असा होता. जेव्हा या गोष्टी कधी अस्तित्वातच नव्हत्या किंवा त्या कधी वापरात येतील असा आपण विचार देखील केला नसावा. आता हेच विचार करा ना आता आपण साबण किंवा सर्फचा वापर करुन कपडे साफ आणि स्वच्छ करतो. परंतू पूर्वीच्याकाळी हे सगळं नव्हतं. मग त्यावेळी लोक कसे कपडे धुवायचे? तेव्हा या सगळ्याच्या जागी काय वापरलं जायचं? तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का? चला याबद्दल जाणून घेऊ या. आधुनिक साबण भारतात 130 वर्षांपूर्वी ब्रिटीश राजवटीत आले. भारतात प्रथमच लेबर ब्रदर्स इंग्लंडने आधुनिक साबण बाजारात आणला. पूर्वी ते ब्रिटनमधून भारतात साबण आयात करायचे आणि त्यांची विक्री करायचे. भारतात जेव्हा लोकांनी साबण वापरण्यास सुरुवात केली, तेव्हा प्रथमच त्याचा कारखाना येथे सुरू झाला. हे वाचा : तुम्ही कधी गोळ्यांच्या पाकिटावर अशी लाल रंगाची पट्टी पाहिलीय? याला कंपनीची डिझाइन समजण्या ची चूक करु नका या कारखान्यात आंघोळीसाठी आणि कपडे साफ करण्यासाठी दोन्ही प्रकारचे साबण बनवले जात असे. 1897 मध्ये मेरठमध्ये देशातील पहिला साबण कारखाना सुरू करणारी नॉर्थ वेस्ट सोप कंपनी ही पहिली कंपनी होती. हा व्यवसाय भरभराटीला आला. त्यानंतर जमशेदजी टाटा यांनी पहिली भारतीय कंपनी म्हणून या व्यवसायात उडी घेतली. पण मग ब्रिटीश येण्यापूर्वी किंवा साबण येण्यापूर्वी लोक कसे अंघोळ करायचे किंवा कपडे धुवायचे? भारत नेहमीच वनस्पती आणि खनिजांनी समृद्ध राहिला आहे. इथे एक झाड आहे त्याला रिठा म्हणतात आणि याचाच वापर कपडे स्वच्छ करण्यासाठी केला जायचा. खरंतर रिठाला फेस येतो, त्यामुळे मग अंघोळ असुदेत किंवा मग कपडे धुणं असूदे, सगळे लोक याचाच वापर करायचे. याच कारणामुळे अनेक राजांच्या वाड्यांमध्ये रिठाची झाडे किंवा रिठाच्या बागा लावल्या गेल्या होत्या. महागडे रेशीम कापड जंतूमुक्त आणि स्वच्छ बनवण्यासाठी रीठा हे अजूनही सर्वोत्तम सेंद्रिय उत्पादन आहे. ज्यामुळे अजूनही बरेच लोक ते धुण्यासाठी साबणाचा वापर न करता या रिठाचाच वापर करतात. आता रेठाचा वापर केस धुण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. रेठापासून शाम्पू देखील बनवले जातात. तो अजूनही खूप लोकप्रिय आहे. हे वाचा : तुमचा फोननंबर ब्लॉक केलाय असं तुम्हाला वाटतंय का? काळजी करु नका, ही ट्रीक वापरा, लगेच होईल खरं खोटं तसेच तुम्हाला खडकांच्या जवळ बऱ्याच ठिकाणी एक पांढरी पावडर पाहायला मिळेल. ज्याला रेह असं देखील म्हणतात. या पावडरचा वापर करुन देखील बऱ्याच ठिकाणी लोक कपडे धुतले जायचे. सोडा एक चांगला पर्याय लोकांना जेव्हा सोडाच्या पर्यायांबद्दल कळालं तेव्हा लोकांनी कपडे धुण्यासाठी याचा वापर करण्यासाठी सुरुवात केली. लोक यामध्ये कपडे बुडवून ठेवायचे आणि त्यानंतर त्यावर लाकडाच्या धोक्याने मारायचे. भारतीयांनी माती आणि राखेने आंघोळ केली केवळ प्राचीन भारतातच नाही तर अगदी काही दशकांपूर्वीपर्यंत भारतीय लोक अंगाला माती आणि राख घासून अंघोळ करत होते किंवा हात स्वच्छ करत असत. भांडी स्वच्छ करण्यासाठी राख आणि चिकणमाती देखील वापरली जात असे. प्राचीन काळी लोक स्वच्छतेसाठी चिखल देखील वापरत असत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या