दिल्ली मेट्रोत पुन्हा हायव्होल्टेड ड्रामा
नवी दिल्ली, 29 जून : रोज अनेक लोक मेट्रोने प्रवास करतात. भर गर्दीमध्ये बऱ्याचदा विचित्र घटना घडतात. एवढंच नाही तर मेट्रोमध्ये अनेक भांडणंही होतात. खास करुन दिल्ली मेट्रोमध्ये असे अनेक प्रकार समोर येत असतात. गेल्या काही महिन्यांपासून दिल्ली मेट्रोतील बरेच वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. यामध्ये आणखी एका व्हिडीओची भर पडली असून नुकताच दिल्ली मेट्रोतील हायव्होल्टेज ड्रामा व्हायरल झालाय. मेट्रोतील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. यामध्ये दोन व्यक्तींची तुफान हाणामारी पहायला मिळत आहे. भर गर्दीत दोन व्यक्तींच्या हाणामारीचा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तु्म्ही पाहू शकता, एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा चेहरा दाबताना दिसत आहे तर दुसरी व्यक्ती त्याला ढकलताना दिसत आहे. दोघांमध्ये जोरदार हाणामारी सुरु आहे. यानंतर काही लोक मदतीला येतात आणि दोघांना बाजूला करण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर भांडण थांबते आणि पिवळ्या टी-शर्ट घातलेली व्यक्ती मेट्रोमधून खाली उतरते.
@sbgreen17 नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 19 सेकंदांचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. व्हिडीओवर अनेक कमेंटही येताना दिसत आहे. दरम्यान, दिल्ली मेट्रोचा व्हिडिओ दररोज व्हायरल होत आहे. कधी कपलचे अश्लील चाळे तर कधी भांडण, तर कधी फॅशन असे व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामुळे आता दिल्ली मेट्रोमधील कधी कशाचा व्हिडीओ व्हायरल होईल काही सांगू शकत नाही.