मुंबई, 10 मे : रस्ते अपघाताचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून तुमच्या काळजाचा ठोका चुकेल, तुम्हाला धडकी भरेल. एका भरधाव कारने एका ट्रॅक्टरला धडक दिली आहे. अपघातात भल्यामोठ्या ट्रॅक्टरचेही दोन तुकडे झाले आहेत. चालकासोबत जे घडलं ते पाहून तुमच्या अंगावर काटा येईल (Car tractor accident video). कार आणि ट्रॅक्टर यांच्यात वजनदार असेल तर तो ट्रॅक्टर. पण भल्यामोठ्या वजनदार ट्रॅक्टरलाही भरधाव कारने उडवलं आहे. व्हिडीओ पाहूनही तुम्हाला विश्वास बसणार नाही. व्हिडीओत पाहू शकता एक ट्रॅक्टर कच्च्या रस्त्यावरून पक्क्या रस्त्यावर येतो आहे. ट्रॅक्टरला एक ट्रॉलीही जोडलेली आहे, ज्यावर काही लोक बसले आहेत. ट्रॅक्टर पक्क्या रस्त्यावर येत असताना त्याचवेळी एक कारही येत असते. ट्रॅक्टर चालक कार ड्रायव्हरला हात दाखवतो. पण कारचालक सुसाट येतो. भरधाव कार ट्रॅक्टरला धडकून पुढे जाते. कार तर पुढे निघून जाते पण ट्रॅक्टरला कारची इतकी जोरदार धडक बसते की त्याचे दोन भाग होतात. ट्रॅक्चरचं इंजिन तुटून वेगळं होतं. तिथंच ड्रायव्हर बसलेला असतो. इंजिनचा पार्ट निघताच ड्रायव्हरही ट्रॅक्टरवरून खाली कोसळतो.
सुदैवाने ट्रॅक्टरचालकचा जीव वाचतो. थोडक्यासाठी तो बचावतो. या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर इतर लोकही बसले आहेत. मोठी दुर्घटना झाली असती तर त्यांचाही जीव गेला असता. हा व्हिडीओ कुठला आणि कधीचा आहे माहिती नाही. पण @oddly_satisfyiinngg इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटिझन्स शॉक झाले आहेत.