JOIN US
मराठी बातम्या / Viral / 'मला आशीर्वाद द्या' आई-वडिलांच्या पाया पडून निघाला, रेल्वे स्टेशनवर जाऊन...

'मला आशीर्वाद द्या' आई-वडिलांच्या पाया पडून निघाला, रेल्वे स्टेशनवर जाऊन...

गेल्या काही वर्षापासून आत्महत्या करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. लोक कधी, कुठे आणि कोणत्या कारणावरुन टोकाचं पाऊल उचलतील काही सांगता येत नाही.

जाहिरात

रेल्वे स्थानकावर धक्कादायक पाऊल

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नेहाल भुरे, भंडारा, 5 एप्रिल : गेल्या काही वर्षापासून आत्महत्या करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. लोक कधी, कुठे आणि कोणत्या कारणावरुन टोकाचं पाऊल उचलतील काही सांगता येत नाही. दिवसेंदिवस या घटना वाढताना दिसून येत आहेत. अशातच यामध्ये भर पडली असून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आलीये. सध्या समोर आलेली घटना भंडारा जिल्हाच्या वरठी येथील आहे. एका 28 वर्षाच्या तरुणाने स्वतःला झोकून देत रेल्वे स्थानकासमोर उडी मारली. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विशाल बागडे असे या युवकाचे नाव असून तो गांधी वॉर्ड, भंडारा येथील रहिवासी होता. घरातून निघताना विशालने आई-वडिलांच्या पाया पडल्या होत्या. आणि म्हणाला…मला आशिर्वाद द्या.

प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, सायकल घेऊन तो वरठी येथे आला होता. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. रेल्वे पोलिसांनी त्याचे प्रेत शवविच्छेदनासाठी पाठविले असून या घटनेचा तपास सुरू आहे. त्यामुळे लवकरच त्यानं हे टोकाचं पाऊल का उचललं असेल हे समोर येईल. हेही वाचा -  टीव्हीवर हवं ते पाहण्यावर बंदी, इतर बातम्या पाहिल्यास होते शिक्षा; विचित्र नियम असलेला देश दरम्यान, गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणावरुनही आत्महत्येच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच अशी टोकाची पाऊलं उचलंचत असल्याचं पहायला मिळत आहे. अशा घटनांमुळे अनेकांच्या मनात भीती बसली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या