JOIN US
मराठी बातम्या / Viral / मुलीला अशा ठिकाणी आले केस की आई हादरली; डॉक्टरही म्हणाले, हा खतरनाक आजाराचा संकेत

मुलीला अशा ठिकाणी आले केस की आई हादरली; डॉक्टरही म्हणाले, हा खतरनाक आजाराचा संकेत

मुलीचं वय जसजसं वाढू लागलं तसतसं हे केसही वाढू लागले. तेव्हा रुग्णालयात नेलं आणि धक्कादायक सत्य समोर आलं.

जाहिरात

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बीजिंग, 14 नोव्हेंबर : डोक्यावर लांबसडक केस असावेत असं कुणाला वाटत नाही. डोक्याशिवाय शरीराच्या इतर भागावरही केस असतात. पण एका मुलाला अशा ठिकाणी केस आले की ते पाहून तिची आई हादरली. इतकंच नव्हे तर जेव्हा या मुलीला डॉक्टरांकडे नेण्यात आलं तेव्हा डॉक्टरांनीही तिला खतरनाक आजार असल्याचं सांगितलं. चीनच्या बीजिंगमध्ये राहणारी 17 वर्षांची वू. जिला लहानपणापासूनच तुम्ही विचारही करणार नाही अशा ठिकाणी केस होते. जसजसं तिचं वय वाढलं,  ती मोठी झाली तसतसं तिच्या पाठीच्या या भागातील केसही वाढले. यामुळे आपल्याला काही कपडेही घालता येत नव्हते, असं वू म्हणाली. आपल्याला कोणता तरी विचित्र आजार आहे, असं तिला लहानपणापासून वाटायचं. लेकीच्या पाठीवरील हे केस वाढू लागले तिच्या आईलाही भीती वाटू लागली. भविष्यात तिला यापेक्षा अधिक गंभीर लक्षणं तर दिसणार नाही, असं तिला वाटू लागलं. यानंतर चार महिन्यांपूर्वी तिच्या पायात वेदना होऊ लागल्या. तिला अस्वस्थ वाटू लागलं. तेव्हा तिला रुग्णालयात नेण्यात आलं आणि भयानक सत्य समोर आलं. हे वाचा -  आश्चर्य! महिलेच्या चेहऱ्यावरून गायब झालं नाक आणि हातावर आलं; काय आहे अजब प्रकरण? वूच्या पाठीच्या खालच्या भागात केस होतं. याचे कारण म्हणजे तिच्या मणक्याच्या हाडात जन्मजात विचित्र विकृती होती. वैद्यकीय तपासणीत याचं निदान झालं. डॉक्टरांनी हा खतरनाक आजाराचा संकेत असल्याचं म्हटलं. बीटाइम डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार बीजिंग जुआनवू रुग्णालयातील न्यूरोसर्जन वांग ज़ुवेई यांनी सांहितलं की, असे भरपूर केस वाढणं हे या विकृतीचं फक्त दिसणारं लक्षण आहे. प्रत्यक्षात हे कित्येक खतरनाक आजारांचं कारण ठरू शकतं.

या मुलीचं डॉक्टरांनी ऑपरेशन केलं. तिची मायक्रोस्कोप सर्जरी केली. डॉक्टर म्हणाले, सर्जरी यशस्वी झाली आणि मुलगी रिकव्हर होत आहे, यामुळे मी आनंदी आहे. तिची प्रकृती आणखी सुधारेल. हे वाचा -  आश्चर्य! हाडामांसाऐवजी चक्क ‘प्लॅस्टिकचं बाळ’; महिलेच्या डिलीव्हरीनंतर डॉक्टरही शॉक त्यामुळे तुमच्या शरीराच्या कोणत्या अशा विचित्र भगाावर केस आले तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ डॉक्टरांकडे जा तपासणी करा. जेणेकरून त्याचं वेळीच निदान होऊन लवकरात लवकर उपचार होतील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या