JOIN US
मराठी बातम्या / Viral / लग्नात दारूची व्यवस्था केली नाही, नातेवाईक जोडप्यावर भडकले; प्रकरण शिव्यांपर्यंत पोहोचले

लग्नात दारूची व्यवस्था केली नाही, नातेवाईक जोडप्यावर भडकले; प्रकरण शिव्यांपर्यंत पोहोचले

लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांसाठी दारूची सोय केली नाही म्हणून पाहुण्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे.

जाहिरात

लग्नात दारू न ठेवल्यानं जोडप्यावर नातेवाईक नाराज

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दिल्ली, 25 मार्च :  वेगवेगळ्या संस्कृतीनुसार विविध पद्धतीने लग्नं होतात. पाश्चिमात्य देशांमध्ये लग्नात प्यायला दारू असतेच. पण एखाद्या लग्नात पाहुण्यांसाठी दारूची सोय नसेल, तर ती मंडळी काय प्रतिक्रिया देणार याचा तुम्हाला अंदाज नसेल. एका लग्नात वधू व वराने लग्नात दारू मागवायची नाही, असा निर्णय घेतला. त्यावर पाहुणे अजिबात खूश नव्हते. खुद्द नवरीने याबद्दल माहिती दिली आहे. एका वधूने Reddit वर आपलं नाव न सांगता अनुभव शेअर केला. हे जोडपं या वर्षाच्या शेवटी लग्न करण्याची योजना आखत आहे आणि त्या दोघांचं कुटुंब खूप मोठं आहे. लग्नाला एकूण 100-150 पाहुणे येण्याची शक्यता आहे. जोडपे आणि वधूची आजी लग्नाच्या खर्चाचा काही भाग उचलणार आहे. नातेवाईकांना दारू न देण्याचा निर्णय  “आमच्या कुटुंबात बरीच मुलं आहेत म्हणून आम्ही लग्नात मुलांना न बोलवण्याचा निर्णय घेतला. तसेच आमच्या लग्नात कोणत्याही प्रकारची दारू मिळणार नाही, असंही सांगितलं. दारू आणि मुलांचा काहीही संबंध नाही पण माझा होणारा पती आणि मी दारू पित नाही, त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला. आम्ही पाहुण्यांसाठी चांगले पदार्थ मागवणार आहोत. पण पिण्यासाठी फक्त पाणी असेल. आम्ही स्वस्तात जर फिल्टर केलेले पाणी अरेंज करू शकतो, तर अल्कोहोल किंवा फिजी ड्रिंक्ससाठी पैसे देणं आम्हाला योग्य वाटत नाही," असं वधूने सांगितलं. नातेवाईकांची नाराजी जेव्हा या जोडप्याच्या कुटुंबीयांना आणि मित्रांना हा निर्णय कळला तेव्हा त्यांनी संताप व्यक्त केला. प्रत्येकाने फक्त पाणी प्यावं, अशी अपेक्षा करणे चुकीचे आहेत. तुम्ही किमान ओपन बार किंवा सोडा तरी मागवायला हवा, असा सल्ला देत अनेकांनी संताप आणि निराशा व्यक्त केली. अल्कोहोल नसेल तर लग्नात मजा येणार नाही, असंही काहींनी म्हटलं. तर, काहींच्या मते हा निर्णय अपारंपरिक आहे. युजर्सच्या प्रतिक्रिया  काही सोशल मीडिया युजर्सनी हा निर्णय योग्य असल्याचं म्हटलं, तर काही जण पाहुण्यांच्या मताशी सहमत होते. पाहुण्यांनी स्वतःच दारू आणावी, असा सल्ला नेटकऱ्यांनी दिला. “दारू नसेल तर हरकत नाही, पण पाहुण्यांना फक्त पाणी देणं योग्य वाटत नाही, तुम्ही किमान सोडा तरी मागवावा,” असं एका युजरने म्हटलं. “आइस्ड टी  किंवा लिंबूपाणी इतकं महाग नाही आणि किमान पाण्यापेक्षा चांगले आहे,” असं दुसऱ्या युजरने म्हटलं. तर “तुमचं लग्न खूपच बोअरिंग असेल, त्यामुळे मला यायचं नाही,” अशी कमेंट एकाने केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या