JOIN US
मराठी बातम्या / Viral / पॅराग्लाइडरची मदत करता करता हवेत उडाला तरुण; उंचावर जाताच हात सुटला आणि...; धडकी भरवणारा LIVE VIDEO

पॅराग्लाइडरची मदत करता करता हवेत उडाला तरुण; उंचावर जाताच हात सुटला आणि...; धडकी भरवणारा LIVE VIDEO

पॅराग्लायडिंगदरम्यान दुर्घटनेचं भयानक दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सँटिआगो, 11 फेब्रुवारी : पॅराग्लायडिंगचे बरेच व्हिडीओ (Paragliding video) सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होत असतात. उत्साहात पॅराग्लायडिंग करायला गेलेल्या किती तरी लोकांची आकाशात जाताच हवा टाइट झाल्याचं तुम्ही पाहिलं आहे. अशा तरुण-तरुणींना आकाशात ओरडताना, रडतानाही तुम्ही पाहिलं आहे. जे पाहून तुम्हाला हसू आवरलं नाही. पण आता पॅराग्लायडिंगचा असा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. जो पाहून तुम्हाला धडकीच भरेल (Man helping paraglider flew into air). पॅराग्लाइडरची मदत करणारी व्यक्तीही त्यांच्यासोबत हवेत उडाली. त्यानंतर ती किती तरी वेळ तशीच हवेत लटकत होती आणि अचानक त्या व्यक्तीचा हात सुटला. ही संपर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडीओ पाहूनच तुमच्या काळजाचा ठोका चुकेल. व्हिडीओत पाहू शकता एक पॅराग्लायडर पायलट एका तरुणीसह आकाशात उड्डाण भरण्याच्या तयारीत आहे. एक ग्राऊंड वर्कर त्याची मदत करत आहे. तो हवेत उडणार तोच पॅराग्लाइडरचं नियंत्रण सुटतो, त्याचा एक हात सुटतो. तेव्हा ग्राऊंड वर्कर त्याला सावरायला जातो आणि पॅराशूट अचानक हवेत उडतं. ग्राऊंड वर्करही पॅराशूटला लटकतो आणि तसाच हवेत उडतो. हे वाचा -  बापरे! …अन् कारचे तुकडे तुकडे झाले; भयंकर अपघाताचा LIVE VIDEO पॅराशूट उडत बराच उंचीवर जातं. तुम्ही पाहू शकता त्याने पायलटच्या कमरेजवळी पट्ट्याला धरलं आहे. उंचावर जाताच ग्राऊंड वर्करचा त्या बेल्टवरून हात सुटतो आणि खाली कोसळतो. त्याला इतक्या उंचावरून खाली कोसळताना पाहून पायलटही घाबरतो तो त्याचं नाव घेत मोठ्याने ओरडतो आणि तो आधी पॅराशूट तरुणीसह सुरक्षित लँड करतो.

त्यानंतर ग्राऊंड वर्करलाही रेस्क्यू करण्यात आलं. त्याला गंभीर जखम झाली नाही. सुदैवाने त्याचा जीव वाचला. हे वाचा -  बापरे! …अन् कारचे तुकडे तुकडे झाले; भयंकर अपघाताचा LIVE VIDEO 6IX WORLD NEWS युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आल आहे. ही घटना चिलीतील लास विजकाचास पुएंतो ऑल्टोमधील असल्याचं सांगितलं जातं आहे. या घटनेची माहिती मिळताच डीजीएसीने याचा तपास सुरू केला आहे. पॅराग्लायडिंग कंपनीकडून याचा रिपोर्ट मागण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या