नवी दिल्ली 14 जून : चित्रपटांमध्ये अनेकवेळा अशी दृश्ये पाहायला मिळतात, ज्यात नायक-नायिकेच्या लग्नामध्ये अचानक थक्क करणाऱ्या घटना घडतात. कझाकिस्तानमधील एका लग्नादरम्यानही अशीच एक धक्कादायक घटना घडली. यात वधू-वर स्टेजवर लग्नाचे विधी पार पाडत होते. विधी दरम्यान एक खेळ खेळला गेला. ज्यामध्ये नवरी नवरदेवाला हरवते. हे पाहून नवरदेव चांगलाच भडकतो. VIDEO: लग्नाच्या स्टेजवरच जोडप्याचं भांडण; नवरीने सगळ्यांसमोर नवरदेवाला लगावली चापट सगळ्या पाहुण्यांसमोर नवरीने आपल्याला हरवल्याचं नवरदेवाला सहन होत नाही. यानंतर रागात नवरदेव अगदी जोरात नवरीच्या डोक्यात चापट मारतो (Groom Slaps Bride on Wedding Stage). हे दृश्य पाहून तिथे उभा असलेले सगळेच हैराण होतात.
आनंदात खेळला जाणारा हा खेळ काहीच वेळात अतिशय गंभीर वातावरणात घेऊन जातो. नवरदेवाचं हे धक्कादायक कृत्य पाहून पाहुणेही एकदम शांत झाले. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. VIDEO: लग्नाच्या दिवशीही नवरदेव स्वतःच्याच नादात मग्न; मंडपात जे केलं ते पाहून खळखळून हसाल हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनीही नवरदेवाचं हे कृत्य संतापजनक असल्याचं म्हटलं आहे. एका यूजरने म्हटलं की नवरदेवाला लाज वाटायला हवी. आशा आहे की नवरी ठीक असेल. नवरीचे आई-वडील हे कृत्य सहन कसं करू शकतात? नवरदेवावर कारवाई व्हायला हवी. आणखी एका यूजरने लिहिलं हा व्हिडिओ हैराण करणारा आहे. नवरीने या व्यक्तीपासून शक्य तितक्या लवकर वेगळं व्हायला हवं. हे अतिशय धक्कादायक आहे.