JOIN US
मराठी बातम्या / Viral / रोमँटिक वेडिंग फोटोशूट करताना कपलसोबत घडला भयंकर प्रकार, VIDEO VIRAL

रोमँटिक वेडिंग फोटोशूट करताना कपलसोबत घडला भयंकर प्रकार, VIDEO VIRAL

सोशल मीडियावर विविध प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. खास करुन लग्नाचे. लग्नाचे अनेक फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर फिरत असतात.

जाहिरात

व्हायरल

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 13 फेब्रुवारी : सोशल मीडियावर विविध प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. खास करुन लग्नाचे. लग्नाचे अनेक फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर फिरत असतात. यामध्ये अनेक मजेशीर, विचित्र आणि धक्कादायक घटना पहायला मिळतात. अशातच लग्नातील आणखी एक व्हिडीओ समोर आला असून व्हिडीओ पाहिल्यावर तुमचंही हसू आवरणार नाही. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये वधू-वर लग्नाचे फोटोशूट करताना दिसत आहे. हे फोटोशूट लग्नाच्या मंडपात बांधलेल्या स्टेजवर सुरु आहे. वरमालाचा कार्यक्रम झाला आहे किंवा या फोटोशूटनंतर वरमालाचा कार्यक्रम होणार होता, पण त्याआधीच रोमॅंटिक फोटोशूट करताना घडलेल्या घटनेमुळे मंडपात एकच हशा पिकला. मात्र काहींना नववधू वराची चिंताही झाली.

संबंधित बातम्या

वधू-वर एकमेकांना मिठीत घेऊन रोमँटिक पद्धतीने पोज देत होते, जेणेकरून तो क्षण कॅमेऱ्यात कैद होऊन आयुष्यभर त्यांच्या सोनेरी आठवणींचा एक भाग राहील. मात्र फोटोशूट करताना नववधू आणि वराचं नियंत्रण बिघडलं आणि दोघेही खाली कोसळले. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओवर खूप साऱ्या प्रतिक्रियाही पहायला मिळत आहे.

Prewedding in jaipur या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. एकंदरीत हा व्हिडीओ जयपूरचा असल्याचं समजत आहे. व्हिडीओ इंटरनेटवर फिरत असून त्याला पुन्हा पुन्हा पाहिला जात आहे. या व्हिडीओवरुन अनेकजण नवरा नवरीची मजा घेत आहेत. दुसरीकडे काहीजण त्यांना ट्रोलदेखील करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या