नवी दिल्ली 23 डिसेंबर : डीजे फ्लोअरवर डान्स (Dance on DJ Floor) करताना लोक स्वतःच्याच नादात दंग असतात. लोक अगदी मजेत गाण्यावर डान्स करत त्या क्षणाचा मनापासून आनंद घेत असतात. फक्त तरुणच नाही तर लहान मुलं आणि वृद्धांनाही डीजेवर डान्स करायला आवडतं. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल (Funny Video Viral) होत आहे. या व्हिडिओमध्ये एक वयस्कर व्यक्ती (Grandpa Dance Video) डीजेवर वाजणाऱ्या गाण्यावर अगदी मनसोक्त नाचत असल्याचं दिसतं. आपल्या नादात दंग होऊन ते हा डान्स एन्जॉय करत आहेत. मात्र पुढच्याच क्षणी आपल्याला इथून पळ काढावा लागेल, याचा त्यांनी विचारही केलेला नव्हता. किकवर चालते जीप; मराठमोळ्या व्यक्तीचा आविष्कार पाहून आनंद महिंद्राही थक्क झाले सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की खुल्या मैदानात रंगीत लाईट चमकत आहेत. सोबतच डीजेवर धमाकेदार गाणं वाजत आहे. जबरदस्त आवाज आणि म्यूझिक ऐकून आसपासचे लोकही थिरकत आहेत. इथे उपस्थित सगळेच लोक अगदी मनापासून गाण्यावर डान्स करत आहेत. यात सगळ्यात मजेशीर आहे, या गर्दीत असलेल्या वृद्धाचा डान्स.
हा व्यक्ती अगदी उड्या मारून डान्सचा पुरेपुर आनंद घेताना दिसतो. त्यांना पाहून काही वेळासाठी तुम्हालाही डान्स करण्याची इच्छा होईल, इतका जबरदस्त त्यांना उत्साह आहे. मात्र, पुढच्याच क्षणी डान्स सोडून या आजोबांना इथून पळ काढावा लागतो. कारण याठिकाणी आजीबाईंची एन्ट्री होते.
व्हिडिओमध्ये दिसतं की आजोबा डान्स करत असतानाच आजीबाई हातात एक मोठी काठी घेऊन तिथे पोहोचतात. आजोबांची नजर या वृद्ध महिलेवर पडते. यानंतर अजिबातही वेळ न घालवता ते तिथून जोरात पळ काढतात. हे मजेशीर दृश्य पाहून तिथे उपस्थित सगळेच हसू लागतात. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर memewalanews नावाच्या पेजवरुन शेअर करण्यात आला असून याला नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळत आहे.