JOIN US
मराठी बातम्या / Viral / संशयी Girlfriend ची दहशत! रागात असं काही केलं की भीतीने Boyfriend शहर सोडूनच पळाला

संशयी Girlfriend ची दहशत! रागात असं काही केलं की भीतीने Boyfriend शहर सोडूनच पळाला

बॉयफ्रेंडचं दुसऱ्या महिलेसोबत संबंध असल्याच्या संशयातून गर्लफ्रेंडने भयंकर पाऊल उचललं.

जाहिरात

प्रतीकात्मक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 10 जानेवारी : प्रेम (Love story) आंधळं असतं. प्रेमात कपल एकमेकांना काहीही देऊ शकतात पण याच प्रेमाने धोका दिला तर मात्र काहीही हिरावूनही घेऊन शकतात (Couple story). सध्या असंच एक प्रकरण चर्चेत आलं आहे. ज्यात संशयी गर्लफ्रेंडने रागात बॉयफ्रेंडसोबत असं काही केलं की अखेर तो भीतीने शहर सोडूनच पळाला (girlfriend’s take revenge of cheater boyfriend). सोशल मीडियावर एका व्यक्तीने आपल्या गर्लफ्रेंडबाबतचा भयंकर अनुभव मांडला आहे (Man Shares Shocking Confession of Girlfriend). दुसऱ्या महिलेसोबत संबंध असल्याच्या संशयातून त्याच्या गर्लफ्रेंडने भयंकर पाऊल उचललं. त्यानंतर त्याला तिची भीतीच वाटू लागली. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार रेडिटवर या व्यक्तीने आपल्या गर्लफ्रेंडचा राज उलगडला आहे. त्याने तिच्याबाबत असं काही सांगितलं, ज्यामुळे सर्वजण हैराण झाले आहेत. हे वाचा -  महिलेने उलगडले Instagram मॉडेल्सच्या सौंदर्याचे रहस्य! ऐकून बसेल धक्का या व्यक्तीने सांगितलं, काही वर्षांपूर्वी तो क्रिस्ट नावाच्या एका स्ट्रिपरला डेट करत होता (Man Dated Stripper who tried to burn house). ती दिसायला जितकी सुंदर होती तितकीच स्वभावात विचित्र होती. दोघांचंही एकमेकांवर प्रेम जडलं. सुरुवातीला दोघांमध्ये सर्वकाही ठिक होतं. पण अचानक ती त्याच्यावर संशय घेऊ लागली. आपला बॉयफ्रेंड आपल्याला फसवतो आहे, त्याचं दुसऱ्या महिलेसोबत अफेअर आहे, ं तिला वाटू लागलं. पण तसं बिलकुल नव्हतं. यावरूनच दोघांमध्ये एक दिवस खूप मोठं भांडण झालं होतं. दुसऱ्या महिलेसोबत अफेअर असल्याच्या संशयातून तिने रागात घर जाळण्याचा प्रयत्न केला (Girlfriend tried to burn boyfriend house). सुदैवाने ती आपल्या प्रयत्नात यशस्वी ठरली नाही. आपल्या गर्लफ्रेंडंचं असं रूप पाहून तो घाबरला आणि त्याने पोलिसात तक्रार केली. हे वाचा -  म्हाताऱ्या बॉयफ्रेंडच्या हट्टापायी महिलेने सुरू केलं धक्कादायक काम आणि आता… यानंतर महिलेला तीन महिन्यांचा तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली. याचदरम्यान तो शहर सोडून पळाला आणि दुसऱ्या शहरात जाऊन राहू लागला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या