प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)
लंडन, 20 जानेवारी : थायलँड म्हणजे अनेक कपलसाठी फिरण्याचं रोमँटिक असं ठिकाण. त्यामुळे बरेच कपल फिरण्यासाठी इथंच जातात. ब्रिटनमध्ये राहणारी एक तरुणीही आपल्या बॉयफ्रेंडसोबत इथं गेली. पण तिथं तिच्यासोबत असं काही भयंकर घडलं की तिने त्याचा स्वप्नातही विचार केला नव्हता. या थायलँड ट्रिपने आपल्याला आयुष्यभराचं दुखणं दिलं असं ती म्हणाली. मॅडी निएले शंक्स्टर असं या तरुणीचं नाव आहे. 21 वर्षांची मॅडी एक ब्युटिशिअन आहे. नुकतीच ती आपल्या बॉयफ्रेंडसह सुट्ट्या एन्जॉय करायला गेली. दोघंही थायलँड ट्रिपवर गेले. तीन आठवड्यांची त्यांची ही ट्रिप होती. एका आयलँडवर ते गेले. दोघांनी राहण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावरील एक लक्झरी हॉटेल बुक केलं. पण तिथं आपल्यासोबत काहीतरी भयंकर घडणार आहे, याचा विचारही त्यांनी केला नव्हता. हे वाचा - 24 वर्षे एकाच ताटात जेवली, झाला मृत्यू; आईच्या निधनानंतर डॉक्टर लेकाला समजलं मोठं सत्य डेली स्टारच्या वृत्तानुसार मॅडी हॉटेलच्या दुसऱ्या मजल्याच्या बाल्कनीवरून खाली कोसळली. इतक्या उंचावरून खाली पडल्याने तिच्या मणक्याचं हाड मोडलं. शरीराच्या इतर भागावरही गंभीर जखमा झाल्या. माहितीनुसार हॉटेलच्या बाल्कनीत सुरक्षेबाबत खबरदारी घेण्यात आली नव्हती त्यामुळे मॅडीसोबत ही दुर्घटना झाली. पडल्यानंतर 40 मिनिटांनी अॅम्ब्युलन्स आली. यादरम्यान मॅडीचं पर्स आणि कार्डही चोरी झालं होतं. तिच्या या अवस्थेतत तिचा बॉयफ्रेंड तिच्यासोबत होता. यानंतर मॅड आपल्या देशात परतली. तिथं तिच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसारआता ती चालूफिरूही शकत नाही. एका न्यूज चॅनेलशी बोलताना मॅडी म्हणाली, “माझ्या मणक्याच्या हाडात फ्रॅक्चर झालं आहे. छातीत पाणी जमा झालं आहे. आता कदाचित मी कधीच चालू-फिरू शकणार नाही. हे खूप वेदनादायक आहे. ही ट्रिप तिला आयुष्यभराचं दुखणं देऊन गेली” हे वाचा - प्रेमासाठी वाट्टेल ते! मैत्रिणीवर प्रेम जडताच तरुणीनं बदलून घेतलं लिंग, पण पुढे नको ते घडलं… त्यामुळे जे मॅडीसोबत घडलं ते तुमच्यासोबत घडू शकतं. त्यामुळे कुठेही फिरायला गेल्यानंतर तिथली सुरक्षा व्यवस्था कशी आहे ते नीट तपासा. शिवाय उत्साहात असं काही करू नका, की ते आपल्याच अंगाशी येईल. नाहीतर मॅडीसारखी पश्चाताप करण्याची वेळ येईल.