नवी दिल्ली 07 जानेवारी : अस्वल हा अतिशय धोकादायक प्राणी आहे. अनेकदा तर हे अस्वल माणसांचा जीवही घेतं. अस्वलाने माणसाला जिवंत खाल्ल्याच्या अशा अनेक बातम्या तुम्ही ऐकल्या आणि वाचल्या असतील. अस्वलाचे पंजे इतके तीक्ष्ण असतात की ते कोणत्याही व्यक्तीला किंवा प्राण्याला मिनिटांत वेदनादायक मृत्यू देतात. मात्र सध्या सोशल मीडियावर असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर कोणाच्याही अंगावर काटा येईल. व्हिडिओमध्ये एक मुलगी अस्वलाच्या मांडीवर बसल्याचं दिसतं (Girl Sits on Bear’s Lap). जणू हे अस्वल एखादं खेळणंच आहे. हा व्हिडिओ पाहून नक्कीच कोणाच्याही काळजाचा ठोका चुकेल. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Shocking Video Viral) होत आहे. चॅलेंज जिंकण्यासाठी माधुरीने बकाबका खाल्ले मोमोज; काय अवस्था झाली पाहा VIDEO व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगी बर्फाळ टेकडीवर अस्वलाच्या मांडीवर बसलेली दिसत आहे. हे दृश्य खरोखरच थक्क करणारं आहे. कारण ही मुलगी या प्राण्याच्या मांडीवर हसताना आणि मस्ती करताना दिसत आहे. तुम्ही पाहिलं असेल की अस्वालाला पाहून भल्याभल्यांची घाबरगुंडी उडते. मात्र ही मुलगी अगदी आरामात अस्वलाच्या मांडीवर बसली आहे. या मुलीचे हावभाव पाहून समजतं की तिला अस्वलाची जराही भीती वाटत नाहीये.
अस्वल आणि या मुलीचा थक्क करणारा हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर hepgul5 नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. हा व्हिडिओ लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ 2 लाख अकरा हजारहून अधिकांनी लाईक केला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण हैराण झाले आहेत. अनेक यूजर्सनी या व्हिडिओवर कमेंट करत प्राण्यांसोबत मस्ती करणं योग्य नसल्याचा सल्ला या तरुणीला दिला आहे. तसंच यात जीवही जाऊ शकतो, असंही म्हटलं आहे.
एका यूजरने कमेंट करत लिहिलं, या तरुणीला याची कल्पनाच नाही, की तिचा जीवही जाऊ शकतो. तर दुसऱ्या एका यूजरने लिहिलं, जंगली प्राणी कधीच माणसांचे मित्र होऊ शकत नाहीत. हा सरळसरळ वेडेपणा आहे. आणखी एकाने कमेंट करत लिहिलं, अस्वलासोबत पंगा घेऊ चुकीचं आहे, हा अतिशक धोकादायक प्राणी आहे.