नवी दिल्ली 30 मार्च : आजच्या युगात अनेकांना शरीरावर टॅटू काढायला आवडतं (Tattoo Lover). पूर्वी ग्रामीण मागासलेल्या भागात टॅटू दिसायचे. मात्र आता तरुण पिढीने फॅशन म्हणून टॅटू काढायला सुरुवात केली आहे. गोंदण आता तरुणांसाठी एक फॅशन बनलं आहे, ज्याद्वारे ते आपल्या शरीरावर अर्थपूर्ण गोष्टी गोंदवून घेतात. मात्र, टॅटू ब्लंडरच्या बातम्याही अनेकदा समोर येत राहतात. अनेक प्रसिद्ध टॅटू कलाकारदेखील अशा चुका अनेकदा करतात (Tattoo Blunder), ज्यामुळे लोक आश्चर्यचकित होतात. बापरे! साधीभोळी खारूताईही असं काही करू शकते? खारीचा Shocking Video Viral Tiktok या सोशल मीडिया साइटवर टायना मोनिक नावाच्या महिलेने तिच्यासोबत घडलेल्या अशाच एका घटनेची कहाणी शेअर केली. टायनाला तिच्या खांद्यावर हार्ट शेप टॅटू हवा होता. हा टॅटू अगदी साधा होता आणि टायनासाठी अतिशय खास होता. तिने टॅटू आर्टिस्टला स्पष्टपणे सांगितलं होतं की तिला एक अतिशय साधा लहान हृदयाच्या आकाराचा टॅटू हवा आहे. मात्र कदाचित टॅटू आर्टिस्टला आपली कला दाखवण्याचा मोह आवरला नाही. आपली कलाकारी दाखवण्याचा नादात त्याने भलतंच काहीतरी करून ठेवलं. टायनाने टॅटू आर्टिस्टला स्पष्टपणे सांगितलं होतं की तिला हार्ट आउटलाइनचा साधा टॅटू हवा आहे. पण कलाकाराने त्याच्याकडे दुर्लक्ष करून त्यात आपली क्रिएटिव्हिटी दाखवली. त्याने टायनाच्या टॅटूमध्ये स्वतःच्या कल्पनाही कोरल्या. कलाकाराने या टॅटूमध्ये दोन स्पष्ट स्पॉट्स ठेवले, जे अतिशय अजब दिसतात. Tyna ने ऑनलाइन ट्रेंडिंगचा भाग म्हणून what I wanted vs what I got अंतर्गत हा व्हिडिओ शेअर केला आहे. 7 वर्षाच्या मुलाला अचानक होऊ लागला श्वास घेण्यास त्रास; X-ray रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा टायनाने तिच्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे सांगितलं की तिला फक्त निळ्या आऊटलाइनमध्ये एक लहान हार्ट शेप टॅटू हवा होता. मात्र यात एवढी मोठी चूक होईल असं तिला वाटलं नव्हतं. जेव्हा लोकांनी टॅटू आर्टिस्टचं काम पाहिलं तेव्हा सगळेच त्याच्यावर भडकले. अनेकांनी यावर नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या. एकाने तिला सल्ला दिला की त्या आर्टिस्टकडूनच टॅटू रिमूव्हलसाठी पैसे घे, तर आणखी एकाने म्हटलं की याच भीतीमुळे मी टॅटू काढून घेत नाही.