मुंबई 12 सप्टेंबर : लग्न हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा आहे. कारण या नंतर त्या व्यक्तीचं आयुष्यच बदलणार असतं. ज्यामुळे हा दिवस आपल्याला नेहमी लक्षात राहावं असं अनेकांना वाटतं. ज्यामुळे घरचे सगळे देखील जोरदारपणे लग्नाच्या तयारीला लागतात. त्यात लग्नात महत्वाची असते ती म्हणजे लग्नपत्रिका. ही पत्रिका देऊन नातेवाईक आणि मित्रमंडळींना बोलावले जाते. तसेच ही पत्रिका देण्यावरुन किंवा त्यावर लिहिलेल्या मानपानामुळे देखील अनेक कुटुंबामध्ये तंटे होतात. म्हणूनच लग्नपत्रिकेला लग्नात महत्वाचं मानलं जातं. परंतू या लग्नपत्रिकेने एक असा काही घोळ घातला आहे, जो ऐकून तुम्हाला धक्का बसेल. खरंतर एक मुलगी आपल्या लग्नाची पत्रिका घेऊन विमानतळावर पोहोचली, परंतू त्यानंतर त्यातून जे काही निघाल, त्याने सगळ्यांच्याच संवेदना उडाल्या आहेत. लग्नपत्रिका घेऊन एक मुलगी विमानतळावर पोहोचलेल्या या महिलेला वाटलं की, तिच्याकडे कोणी लक्ष देणार नाही किंवा पाहाणार नाही, पण यादरम्यान अशी घटना घडली जे पाहून सर्वांच्याच संवेदना उडतील. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, जो आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. हे वाचा : Video : त्याला केस कापण्यासाठी 47 सेकंद पुरेस…. तरुणाच्या नावे आगळा-वेगळा रिकॉर्ड, ज्याला कोणीही तोडू शकलं नाही हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘लग्नाची कार्ड असलेली मुलगी विमानतळावर पकडली गेली. कार्डमध्ये ड्रग्ज होते. काळजी घ्या. विमानतळावर कोणाकडूनही काहीही घेऊ नका, मग त्याचा आकार किंवा ती वस्तू काहीही असो. म्हातारा असो वा तरुण, मग तो पुरुष असो वा स्त्री, मग मूल असो!’
वास्तविक, विमानतळावर उपस्थित अधिकाऱ्यांनी लग्नपत्रिकेच्या आतून ड्रग्ज जप्त केले. त्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोकांना धक्काच बसला आहे. हे वाचा :वडिलांच्या अंत्यसंस्काराला गेला आणि मुलाला गमावून बसला, 24 तासात दोघांच्या मृत्यूने शिक्षक कोमात खरंतर लग्नपत्रिकेच्या आत ड्रग्ज लपवले जातील, असे कुणालाही वाटले नसेल. मात्र, उच्च तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तरुणीला पकडण्यात आले आहे, आता पोलीस तिची चौकशी करत आहेत. आयपीएस अधिकाऱ्याने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये विमानतळाबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी आपले मत व्यक्त केलं आहे.