ऑनलाईन फ्रॉड
नवी दिल्ली, 4 जून : आजकाल इंटरनेटचं जग झालं आहे. लोक आपला दिवसभरातील सर्वात जास्त वेळ सोशल मीडियावर व्यतित करतात. अनेकजण सोशल मीडियावर त्यांच्या आयु्ष्यातील घडणाऱ्या घटना शेअर करतात. त्यांच्यासोबत दिवसभरात काय झालं हे त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या फॉलेवर्ससोबत शेअर करत असतात. त्यामुळे तुम्हाला दिवसभरात अनेक लोकांचे वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल झालेले पहायला मिळतील. एक तरुणीनं नुकताच तिच्यासोबत घडलेला प्रकार सोशल मीडियावर शेअर केलाय. तरुणीनं ऑनलाईन शॉपिंग अॅप मिशो वरुन ब्रेसलेट मागवलं होतं. मात्र तिच्यासोबत घडला विचित्र प्रकार. ब्रेसलेटऐवजी तिच्याकडे भलतीच गोष्ट आली. तिनं यांसंदर्भात सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत माहिती दिली.
व्हिडीओमध्ये तरुणीनं सांगितलं की, तिनं ऑनलाईन शॉपिंग अॅप मिशोवरुन ब्रेसलेट मागवलं. मात्र तिच्या घरी भलतीच गोष्ट पोहोचली. तिला पॅकेटमध्ये एक संपलेली क्रिम आली. पॉन्ड्स क्रिमचा संपलेला डब्बा पाहून तरुणी थक्क झाली. ती म्हणते की, एकवेळेस हा क्रिमचा डब्बा भरलेला असता तर ठेवायचा विचार तरी केला असता मात्र या रिकाम्या डब्याचं मी काय करणार.
या तरुणीचं नाव ऐश्वर्या खजुरिया आहे. तिनं हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. बघता बघता हा व्हिडीओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल झाला. व्हिडीओवर अनेक कमेंटही येताना दिसतायेत. ऑनलाईन प्रकरणी अशा फसवणूकीच्या अनेक घटना आत्तापर्यंत समोर आल्या आहेत.