JOIN US
मराठी बातम्या / Viral / बाबो! So cute म्हणत चक्क गेंड्यांना मिठीत घेऊन तरुणी किस करायला गेली आणि...; पुढे काय घडलं पाहा VIDEO

बाबो! So cute म्हणत चक्क गेंड्यांना मिठीत घेऊन तरुणी किस करायला गेली आणि...; पुढे काय घडलं पाहा VIDEO

गेंड्याना प्रेमाने कुरवाळण्याची हिंमत तरुणीने केली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 04 फेब्रुवारी : काही लोकांना प्राणी खूप आवडतात. कुणाला कुत्रा, कुणाला मांजर आवडतं. असे प्राणी पाळून त्यांना आपल्या कुशीत घेत कुरवाळत त्यांना मिठी मारत त्यांची किस घेताना बऱ्याच लोकांना तुम्ही पाहिलं असेल. असे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण या कुत्रा-मांजराला जसं तुम्ही प्रेम देता तसं अवाढव्य गेंड्यावर (Rhinoceros)  कराल का? फक्त विचार करूनच तुम्हाला घाम फुटला. पण अशाच गेंड्याच्या प्रेमात पडली ती एक तरुणी (Rhinoceros and girl video). गेंड्यावर प्रेम करणाऱ्या या तरुणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. गेंड्यांना पाहून ही तरुणी आऊट ऑफ कंट्रोल झाली. त्यांना पाहून तिच्या आनंदाला पारावर उरला नाही. जसे गेंडे तिला दिसले तशी ती त्यांच्याजवळ गेली आणि त्यांना तिने अक्षरशः मिठीच मारली. इतकंच नव्हे तर तिने त्यांना किसही केलं. महिलेचं हे कृत्य पाहून सर्वजण हादरले. हे वाचा -  VIDEO - मित्रांनी दिलेलं गिफ्ट पाहून लाजली नवरी; नेटिझन्स म्हणाले, ‘काम की चीज’ हत्तीनंतर सर्वात अवाढव्य कोणता प्राणी असेल तर तो म्हणजे गेंडा. गेंड्याचं शरीर पाहूनच आपल्याला धडकी भरते. भल्याभल्या प्राण्यांनाही गेंडा भारी पडतो. अशा प्राण्याजवळ जाण्याची या तरुणीने फक्त हिंमतच केली नाही तर त्यांना मिठी मारून किसही केलं.

संबंधित बातम्या

महत्त्वाचं म्हणजे या गेड्यांनीही या तरुणीला काही केलं नाही. एक गेंडा तिच्या पायावर डोकं ठेवून शांत झोपलेलाही दिसतो आहे. तर इतर दोन गेंडेही तिचं प्रेम पाहून तिच्याजवळ येतात. त्यांच्या तोंडावरून ती हात फिरतवताना दिसते. हे वाचा -  VIDEO - …अन् जीवाची पर्वा न करता विना कपडे तरुणाने गोठलेल्या तलावात उडी मारली rhinohuose नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. गेंड्यांना कुरवाळताना दिसणारी ही तरुणी जरी बिनधास्त दिसत असली तरी पाहणाऱ्याला मात्र धडकी भरली आहे. त्यांनी या तरुणीबाबत चिंता व्यक्त केली आहे. तिचा हा मूर्खपणा असल्याचं म्हटलं आहे. तसंच गेंडे इतके शांत कसे काय असाही प्रश्न एका युझरने विचारला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या