फोटो सौजन्य: Guinness World Records
नवी दिल्ली, 29 मार्च : अनेकांना खायला आवडतं. तर काहीजण अगदी खाण्यासाठीच जगत असल्याचंही गमतीने (Food Lovers) म्हणतात. अनेक जण वेगवेगळे पदार्थ खाण्यासाठी अतिशय लांबचा प्रवासही करतात. सोशल मीडियावरही अनेक हॉटेल, स्ट्रिट फूड, हटके फूडचे व्हिडीओ केले जातात. केवळ पोट भरण्यासाठीच नाही, तर खावून आनंद मिळत असल्याने अनेकजण सतत खातात. अनेकांना केवळ खाण्यामुळेच प्रसिद्धीही मिळाली आहे. अशाच एका तरुणीने खाण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड (Guinness World Records) केला आहे. एका तरुणीने एका मिनिटाच्या आत सर्वाधिक चिकन नगेट्स खाण्याचा नवा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. ब्रिटनच्या स्पीड-इटर अर्थात फास्ट खाणाऱ्या लिआ शुटकेवर या तरुणीने (Leah Shutkever) हा रेकॉर्ड केला आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सनुसार, लिआकडे आधीच काही वर्ल्ड रेकॉर्ड्स आहेत. ज्यात आता एका मिनिटांत सर्वाधिक चिकन नगेट्स (775.1 ग्रॅम) खाण्याचा रेकॉर्ड सामिल आहे.
लिआ शुटकेवर या तरुणीला लहानपणापासूनच अतिशय फास्ट जेवणाची सवय आहे. ती 23 वर्षांची असताना तिच्या भावाने तिला एका रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी चॅलेंज दिलं होतं. तेव्हापासून लवकरात लवकर खाण्याचा ती प्रयत्न करते आणि आज ती स्पीड-इटर ठरली असून अनेक गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स तिने केले आहेत. या रेकॉर्ड्सबाबत बोलताना तिने सांगितलं, की ज्यावेळी तुम्ही एखादं लक्ष्य निर्धारित करता आणि ते पूर्ण करता तेव्हा तुमचा आत्मविश्वास वाढतो. आणि हे माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचं वळण आहे.
लिआने केलेले रिकॉर्ड्स - - 2019 मध्ये तिने केवळ 7.80 सेकंदात सर्वात वेगात अंडी खाण्याचा रेकॉर्ड केला होता. - त्यानंतर 2019 मध्येच तिने सर्वात फास्ट हात न लावता 21.95 सेकंदात मफिन खाण्याचा रेकॉर्ड केला आहे. - एका मिनिटांत सर्वात वेगात मार्शमेलो खाण्याचा रेकॉर्ड तिने 2020 मध्ये 20 सेकंदात केला आहे. - त्याशिवाय एका मिनिटांत सर्वात फास्ट टोमॅटो खाण्याचा रेकॉर्डही तिने 2020 मध्ये केला. हा रेकॉर्ड केवळ 8 सेकंदात तिने पूर्ण केला होता.