JOIN US
मराठी बातम्या / Viral / 'फोनवर इतर कुणाशी का बोलते?', GF ने दिलं असं सॉलिड उत्तर; BF आयुष्यात चुकूनही पुन्हा विचारणार नाही प्रश्न

'फोनवर इतर कुणाशी का बोलते?', GF ने दिलं असं सॉलिड उत्तर; BF आयुष्यात चुकूनही पुन्हा विचारणार नाही प्रश्न

गर्लफ्रेंडने दिलेलं उत्तर ऐकून बॉयफ्रेंडही हैराण झाला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 26 एप्रिल : सोशल मीडियावर नवरा-बायको, गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडचेही बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात (Girlfriend Boyfriend Video). सध्या असाच एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. बॉयफ्रेंडने आपल्या गर्लफ्रेंडला एक प्रश्न विचारला. बॉयफ्रेंडच्या अशा प्रश्नाने गर्लफ्रेंड भडकली. त्यावर तिने इतकं खतरनाक उत्तर दिलं की यापुढे तो आयुष्यात काय पुढच्या सात जन्मात तसा प्रश्न विचारण्याची हिंमत करणार नाही. बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडला विचारतो की ती फोनवर इतर कुणाशी का बोलते? त्यावर जे उत्तर मिळालं ते ऐकून बॉयफ्रेंड शॉक झाला. असा प्रश्न विचारून आपण सर्वात मोठी चूक केली, असंच त्याला वाटलं. आता असं तिने नेमकं काय उत्तर दिलं ते जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल. हे वाचा -  10 रुपयांच्या नोटेवरील हटके Love Story Viral! GF Kusum च्या मेसेजवर BF Vishal चा भन्नाट रिप्लाय व्हिडीओत पाहू शकता गर्लफ्रेंड म्हणते, “माझ्याकडे हा फोन आहे तो माझा आहे. इथं जो चार्ज लागतो तोसुद्धा माझा आहे. मोबाईलमध्ये रिचार्ज माझे पप्पा करतात आणि तेसुद्धा माझे आहेत. त्यामुळे जास्त दाखवू नकोस ठिक आहे. मी कुणाशीही बोलेन. ती माझी मर्जी आहे”

संबंधित बातम्या

यानंतर बॉयफ्रेंडच्या हातातील चष्मा हिसकावून आपल्या डोळ्यांवर लावत ती स्वॅगमध्ये तिथून निघून जाते. ज्या स्टाईलने ती उत्तर देते आणि निघून जाते ते जबरदस्त आहे. bhutni_ke_memes नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला हे आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या